सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | पुनद प्रकल्प अंतर्गत चणकापूर उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढविणेच्या कामाच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत ९ कोटी ९९ लाख २३ हजार ६२५ रुपये एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. डॉ. राहुल आहेर यांनी दिली. याबाबत बोलतांना आ. डॉ. राहुल आहेर म्हणाले की, चणकापूर उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढविणेच्या कामाच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देणारा शासन निर्णय १५ ऑक्टोबर २०२४ प्रसिद्ध केला आहे.
Deola | श्री. बालाजी पतसंस्थेचे कामकाज कौतुकास्पद; सी. ए. महेश मुंदडा
या कालव्याचा कळवण व देवळा तालुक्यातील सिंचन क्षेत्राला लाभ
पुनद प्रकल्पातंर्गत अंतर्भूत असलेला व अस्तित्वातील चणकापूर धरणापासून उजवा कालवा काढण्यात आला असून, त्याची लांबी ३८.२१ कि. मी. इतकी आहे. या कालव्याद्वारे कळवण व देवळा तालुक्यातील ७,८७४ हेक्क्टर सिंचन क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. अस्तित्वातील रामेश्वर ल. पा. तलावातून ३५.९० किमी. लांबीचा चणकापुर उजवा वाढीव कालवा काढण्यात आलेला आहे. वाढीव कालव्याद्वारे भौगोलिक परिस्थितीनुसार देवळा व मालेगाव तालुक्यातील २ ल. पा. तलाव व २३ पाझर तलाव व ११ को. प. बंधारे त्यांच्या ५० टक्के क्षमते पर्यंत चणकापूर धरणातील पूरपाण्याने भरण्याचे प्रस्तावित आहे. पुनद प्रकल्पाच्या मंजूर प्रकल्प अहवालानुसार चनकापूर उजव्या कालव्याच्या मुखाशी १७६.०० घ. फु. प्रती सेकंद इतकी वहन क्षमता असून रामेश्वर तलावाची साठवण क्षमता ७६ द. ल. घ. फु. इतकी राहणार आहे. चणकापूर उजव्या कालव्याचे काम सन. १९९५-९६ ते २००० या कालावधीत पूर्ण करण्यात आले सन. २००० पासून सदर कालवा सिंचनाच्या पूर पाण्याने प्रवाहित होत आहे.
Deola | पाटचारीच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान; नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
दुष्काळी भागात तलाव भरण्यासाठी अडचणी येत होत्या
चणकापुर उजवा कालवा व त्यापुढील वाढीव कालव्याद्वारे चणकापुर धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पावसाळ्यातील ओव्हर फ्लोच्या पाण्याने देवळा व मालेगाव या दुष्काळी तालूक्यातील तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यास अडचणी येत असल्याने कालव्याची वहनक्षमता वाढविल्याने जेणेकरून कमी कालावधीत तलाव भरणे शक्य होणार असल्याचे शेवटी आ. डॉ. आहेर यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम