Manoj Jarange Patil | आज दसऱ्याच्या निमित्ताने राज्यभरात दसरा मेळावे पार पडणार असून बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा भगवानगडावर तर मनोज जरांगे पाटलांचा नारायण गडावर दसरा मेळावा पार पडला आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दसरा मेळाव्याला नारायण गडावर लाखोंच्या उपस्थितीत त्यांनी “आता झुकायचं नाय” असे आवाहन केले आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जरांगे यांनी संघर्षाचा नारा दिला असून हा दसरा मेळावा मराठवाड्यात मोठ्या जोशात पार पडला आहे.
Manoj Jarange | आठ दिवसांनंतर मनोज जरांगें कडून उपोषण सोडण्याची घोषणा!
“जय शिवराय”च्या घोषणेने जरांगेनी आपल्या भाषणाची सुरुवात करत, नारायण गडावर झालेल्या या भव्य मेळाव्यात सुमारे 500 एकर परिसरात लाखो मराठा बांधवांना आधार दिला. “मराठा समाजाला कधी जातिवादात ओढले गेले नाही. आपण नेहमीच न्यायाची बाजू घेतली आहे. पण अन्याय सहन केला नाही” असे ते यावेळी म्हणाले.
मराठा समाजाने कधीच हार मानली नाही
“जर अडवणूक केली तर, उठाव करावाच लागेल. छत्रपती शिवरायांनी देखील उठाव केला होता. आपल्याला सुद्धा अन्यायाविरुद्ध लढा द्यावा लागणार आहे.” असे मनोज जरांगेनी यावेळी सांगितले असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “देशाच्या आणि राज्याच्या उन्नतीसाठी मराठा समाजाने संघर्ष केला आहे. तलवारी हातात घेऊन लढले आहेत. मान कापली आहे, पण कधीच हार मानली नाही.” असे देखील ते यावेळी म्हणाले.
“….त्यांना जनतेने उलटवलं आहे”
“या गडाच्या आशीर्वादाने दिल्लीवर दबाव निर्माण करता येतो. जे दिल्लीला जाऊन उलटले त्यांना जनतेने उलटवलं आहे.” असा टोला जरांगेंनी यावेळी विरोधकांना लगावला. “आजवर मराठा समाजाच्या वाट्याला फक्त अन्याय आला आहे. आमचे पाप काय आहे हे तरी सांगा!” असे म्हटले असून “मराठा समाजाचा तगडा विरोध सहन करावा लागणार आहे.” असे म्हणत मनोज जरांगे यांनी दिल्ली पासून राज्यापर्यंतच्या नेतृत्वाला इशारा दिला आहे.
मराठा समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन
“राज्यात मराठा, मुस्लिम, ओबीसी समाजावर अन्याय होत असून षडयंत्र रचली जात आहेत. जर आपल्या समाजाला न्याय मिळाला नाही, तर यावेळेस मोठी उलथापालथ होईल.” असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच “मराठा समाजाच्या लेकरांना मान खाली घालावी लागू नये. त्यांना अधिकारी बनलेले पाहायचे आहे. जर कोणीही आपल्याला झुकवायला आला, तरी आपण झुकायचे नाही.” असे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे. तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजाला न्याय मिळत नसून शेतकरी व गरीब लोकांवर अन्याय होत आहे. यावरून त्यांनी सरकार विरोधात उठाव करण्याचा इशारा दिला असून समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे.
Manoj Jarange | “तुमचे बारा-तेरा वाजवल्याशिवाय..”; जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
सरकारला सडेतोड उत्तर देऊ- मनोज जरांगे
आरक्षणाच्या मुद्यावर सरकारला इशारा देत, “दुसऱ्यांच्या अंगावर गुलाल टाकण्याच्या नादामध्ये आमच्या लेकरांना कलंक लागू देऊ नका.” असे म्हटले आहे. “आता काही जातींना आरक्षण दिले जात आहे. पण यामुळे आमच्या हक्कांवर अन्याय होतो आहे. आरक्षणाचे आश्वासन मिळाले पाहिजे.” असे त्यांनी सांगितले असून जर सरकारने आरक्षण दिले नाही तर आमचे आंदोलन थांबणार नाही. आम्ही सरकारला सडे-तोड उत्तर देऊ असं म्हणत राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम