Chagan Bhujabal | छगन भुजबळांचे भावनिक आवाहन; ही निवृत्तीची घोषणा की विधानसभेसाठी नवा डाव…?

0
51
#image_title

Chagan Bhujabal | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी “आपल्याला काही काळ आराम करायचा आहे.” असे सांगत एकप्रकारे निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी आता सामाजिक कार्याची जबाबदारी घ्यावी आणि राजकारणात स्वतःच्या निर्णय क्षमतेवर पुढे जावे, असे आवाहन केल्याने. छगन भुजबळ याविषयी खरोखर गंभीर आहेत की, निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना भावनिकपणे साद घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

Chagan Bhujabal | कांदे-भुजबळ वाद पुन्हा पेटणार….?; भुजबळांच्या पोस्टने भुवया उंचावल्या

मतदारांना भावनिक साद

शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यातील नांदगाव मतदार संघात यापूर्वी भुजबळ यांचे पुत्र पंकज यांनी सलग दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीत या जागेवर भुजबळ यांच्याकडून पुतणे तथा माजी आमदार समीर भुजबळ यांना मैदानात उतरवण्याचे नियोजन केले जात आहे. आपल्या घरातील एखादा सदस्य निवडणूकीच्या रिंगणात उतरत असेल, तेव्हा छगन भुजबळ कायमच मतदारांना भावनिक साद घालत असतात त्याचे उदाहरण नांदगाव येथे समीर भुजबळांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुन्हा पाहायला मिळाले.

काय म्हणाले भुजबळ? 

भुजबळांनी “राज्याबरोबरच आता नाशिक जिल्ह्याची मोठी जबाबदारी आता तुमच्यावर आहे. दोघांनी आता सामाजिक कार्य पुढे न्यावे, काहीही करण्यापूर्वी आपणास विचारण्याची गरज नाही. आपल्याला काही काळ आराम करायचा आहे.” असे नमूद केले. या भावनिक आवाहनातून भुजबळांना नांदगावमध्ये पुन्हा जम बसवायचा आहे की राजकारणातून निवृत्त व्हायचे आहे. असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.

Chagan Bhujabal | मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश; किकवी पेयजल प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

लोकसभेपासून नाराजी

लोकसभा निवडणुकीपासून भुजबळ नाराज असल्याचे मानले जात असून आता मात्र ते येवल्यामध्ये विधानसभेच्या तयारीला लागले असून मागील दोन दशकांपासून या मतदारसंघावर त्यांचे वर्चस्व त्याच्याकडे राहिले आहे. निवृत्तीच्या संकेतांमुळे या मतदारसंघाची जबाबदारी कोणाकडे जाणार? या चर्चांना सध्या उधाण आले आहे. तसेच पुतण्या समीरला नांदगावमध्ये पाय रोवता यावेत म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे, मतदारांना भावनिक साद घातली असून समीर भुजबळ हे 2009 मध्ये नाशिकमधून लोकसभेत पोहोचले होते. या निवडणुकी वेळी मराठा-ओबीसी वाद उफाळून आला होता. त्यावेळी छगन भुजबळ यांनी नाशिककरांना, “आपला पुतण्या तुमच्या पदरात टाकत आहे, त्याला सांभाळून घ्यावे” असे आवाहन केले होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here