द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : कोरोनावरील लस कोविशील्ड ही ओमीक्रॉनवर काही महिन्यांनंतर उपयुक्त ठरत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सारे चिंतेत आहेत. त्यात आता कोविशील्ड ही लस ओमीक्रॉन विरोधात काही महिन्यांत निष्प्रभ ठरत असल्याचे सांगण्यात आल्याने, आता चिंता वाढली आहे.
भारतात कोविशील्ड म्हणून दिली जाणारी कोरोनावरील लस ब्रिटन मध्ये ऍस्ट्राझेनेका नावाने ओळखली जाते. आणि ही ऍस्ट्राझेनेका कोरोनाचा नवा प्रकार ओमीक्रॉन विरोधात काही महिना कालावधी नंतर उपयुक्त ठरत नसल्याचे ब्रिटनमधील संशोधनात स्पष्ट झाले असल्याचे, सांगण्यात येत आहे. यामुळे आता जगाची चिंता वाढली आहे.
ब्रिटनमध्ये याच कारणास्तव बूस्टर डोसची तयारी देखील सुरू झाली आहे. कोविशील्ड अर्थात ऍस्ट्राझेनेका जर काही महिन्यांत ओमीक्रॉनवर निष्प्रभ ठरत असेल, तर ही धोक्याची घंटा आहे. आणि त्या दृष्टीने आता पाऊले उचलणे आवश्यक आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार ओमीक्रॉनने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे तेथील प्रशासन त्रस्त झाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे इथल्या प्रशासनाने आता बूस्टर डोससाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
ब्रिटनमधून आलेल्या या बातमीने प्रशासनाची तसेच कोविशील्ड घेतलेल्या नागरिकांची देखील चिंता वाढली आहे. जर अशा प्रकारे एखादी लस ही कोरोनाच्या एखाद्या प्रकारा विरोधात निष्प्रभ ठरत असेल, तर प्रशासनाला आता अधिक सतर्क होणे तर आवश्यक आहेच. पण त्याचबरोबर आता नागरिकांनी देखील गाफील न राहता काळजी घेणे गरजेचे आहे.
भारतात कोरोनावरील प्रतिबंधासाठी कोविशील्ड लस घेतलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच या आधीपासूनच भारतात बूस्टर डोस बाबत चर्चा सुरू होती. आता ब्रिटन मधील आलेल्या या नव्या संशोधनाने प्रशासनाची चिंता नक्कीच वाढली असेल.
या नव्या संशोधनामुळे आता भारतातील प्रशासनाला देखील तयारी करावी लागू शकते. कारण, भारतात देखील ओमीक्रॉन हा कोरोनाचा नवा प्रकार पसरू लागला आहे. दिवसागणिक ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आता भारतात बूस्टर डोस देण्याबाबत पाऊले उचलली जाऊ शकतात.
आता नागरिकांनी देखील आपापल्या पातळीवर काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या नागरिक मोठ्या प्रमाणावर कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता वागताना दिसत आहेत. मास्क न लावणे, अंतर न पाळणे अशा प्रकारे कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत आहे.
आता ब्रिटन मधील या नव्या संशोधनाने तरी नागरिक बोध घेतील अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम