सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | केदा नाना आहेर यांनी गेल्या दोन महिन्यापासून चांदवड व देवळा तालुक्यातील मतदारांच्या गाठीभेटी घेत बैठकांचे सत्र सुरू केले आहे. देवळा तालुक्यातील अनेक गाव त्यांच्यासाठी गावातील आपले सर्वच राजकीय मतभेद दूर ठेवून एकत्र येत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. पक्ष तिकीट देवो अथवा ना देवो आपण उमेदवारी करावीच असा आग्रह गावागावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून धरला जात आहे. गावं एकत्र येत सर्वच घटकातून मिळत असलेला प्रतिसाद ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे.
Deola | नाशिक कृषी तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी राजेश कदम यांचा सत्कार
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी देवळा चांदवड मतदारसंघात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व नाफेड चे राज्य संचालक केदा नाना आहेर यांनी उमेदवारी करावी यासाठी देवळा तालुक्यातील गावागावांतुन ग्रामस्थ पुढे सरसावले असून, प्रत्येक गावातून बैठकीद्वारे राजकिय मतभेद बाजूला ठेवून एकमुखी मागणी करीत आहेत. यामुळे देवळा तालुक्यातुन एकमेव केदा नाना आहेर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
उमेदवारीसाठी दोघा भावांमध्ये रस्सीखेच
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदवड-देवळा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या तिकिटासाठी विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर व नाफेडचे राज्य संचालक केदा नाना आहेर या दोघा भावात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत असल्याने विधानसभा आखाड्यातच भाऊबंदकीची कुस्ती पाहायला मिळणार आहे. केदानाना आहेर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार दंड थोपटले असून त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे. चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक पासून डॉ. राहुल आहेर हे भाजपचे आमदार आहेत. यंदा मात्र त्यांना तिकिटासाठी त्यांचे बंधू केदा आहेर हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहचत आहे. तर गावागावातून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी बैठका सुरू झाल्या आहे.
यामुळे केदा आहेर यांची निवडणूक लढविण्याची इच्छा काही लपून राहिली नाही. गेल्या अनेक वर्षापासून आपण पक्षाचे काम करतोय व बंधू राहुल आहेर यांना दोनदा आमदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पक्ष व माझे बंधू आ. डॉ. राहुल आहेर माझ्या कामाची दखल घेवून मला संधी देतील, असा विश्वास केदा नाना आहेर यांनी व्यक्त केला आहे.
हेवेदावे बाजूला ठेवून उमेदवारी करावी
तालुक्यातील वाखारीसह, वाखार वाडी, वाजगाव, कणकापूर, शेरी, वार्षि, खर्डे, वडाळा, मटाने, सटवाई वाडी, आदी गावातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून केदा नाना आहेर यांनीच उमेदवारी करावी असा आग्रह धरला आहे. गेल्या ३५ वर्षांच्या कार्यकाळात देवळा तालुक्याच्या विकासाला व नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. तालुका वाशीयांनी जो विश्वास मागील अनेक वर्षांपासून ठेवला त्याला सार्थ ठरविण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. तसेच येणाऱ्या काळात विकसित चांदवड-देवळा याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून तालुका वाशीयांच्या पाठबळावर मी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. असे आहेर यांनी सांगितले.
Deola | देवळा अभिनव व जनता विद्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा
तर येथील गावागावातील ग्रामस्थांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांदवड-देवळा तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी केदा नाना आम्हाला आता तुम्हीच आमदार हवे आहेत अन तुम्हाला आमदार करण्यासाठी अनेक घटक आपापल्या परीने योगदान देण्यासाठी पुढाकार घेणार असून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत न थांबता उमेदवारी करावी असा एकमुखी आग्रह धरण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम