द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षापासून शिक्षण व्यवस्था कोरोनामुळे खिळखिळी झाली असून अनेक विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा होईल म्हणून निवांत आहेत, मात्र त्यांच्या साठी ही बातमी महत्वाची आहे. कोरोनाच्या नवीन अमोयक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत (ssc hsc exam)मोठा निर्णय घेतला आहे.
10वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षा पारंपरिक पद्धतीनेच करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे (maharashtra government)पाठवला आहे, ऑनलाइन परीक्षा हा पर्याय होऊ शकत नाही म्हणून पारंपरिक परीक्षा घेण्यात यावी असा आग्रह बोर्डाचा आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
देशात सध्या कोरोनाच्या नवीन अमोयक्रॉन व्हेरिएंटच्या (omicron variant)पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत (ssc hsc exam)मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या परीक्षा पारंपरिक पद्धतीनेच करण्याचा राज्य सरकारकडे प्रस्ताव (maharashtra government) पाठवला आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष गोसावी यांनी सांगितले.
ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे (omicron variant)पुन्हा बोर्डाच्या परीक्षा संकटात येणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, ‘बोर्डाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. लवकरच निर्णय होईल. परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेण्याचाच प्रयत्न आहे. मात्र, दुर्दैवाने काही आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास शासनाच्या आदेशानुसार कृती करू. ऑनलाइन परीक्षा झाल्यास मूल्यांकन कसे करावे, यासाठीचा विचारही सुरू करण्यात आला आहे अशी माहिती गोसावींनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम