लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा

0
42

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय २०२०-२१ हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहे. याचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राने स्पेक्ट्रम अकॅडमी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विद्यार्थ्यांसाठी “ओळख स्पर्धा परीक्षेची” या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना UPSC (लोकसेवा आयोग), MPSC (महाराष्ट्र राज्य सेवा आयोग) तसेच केंद्र व राज्यातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेंचे स्वरूप व पूर्वतयारी या विषयावर स्पेक्ट्रम अकॅडमी नाशिकचे संचालक प्रा. सुनील पाटील, समन्वयक अर्चना पवार तसेच वेदिका बिस्वास व संतोष जेजुरकर यांच्या कडून सखोल मारदर्शन लाभले.

तत्पूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. वर्षभर सुरू राहणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा व आपले करिअर सुनिश्चित करावे असे नमूद केले.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तर पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना अनेक संधी उपलब्ध होऊ शकता व एक शासकीय अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही असे ही त्यांनी विशद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी डॉ. राकेश पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. संदीप वाघ यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे एच.आर व फायनान्स हेड डॉ. विनीत रकीबे, डॉ. एस.डी. मांजरेकर, प्रा. स्वप्नील आल्हाट, प्रा. स्वप्नील धात्रक, प्रा. मुरकुटे, सर्व वर्ग समन्वयक तसेच सर्व शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here