देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील कनकापूर ,मेशी ,भऊर ,मटाने ,सटवाईवाडी ,माळवाडी ,गिरणारे व तिसगांव या आठ गावातील ग्रामपंचातींच्या अकरा रिक्त जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत चार उमेदवारांची बिनविरोध निवड झाली तर दोन ठिकाणी निवडणूक घेण्यात येत येत असून, उर्वरित जागांसाठी अर्ज प्राप्त न झाल्याने पदे रिक्त आहेत .
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे – कनकापूर ग्रामपंचायत- बायजाबाई दिनकर शिंदे ( सर्वसाधारण महिला ) ,माळवाडी ग्रामपंचायत – मछिंद्र बबन आहिरे (अनु . जाती ), सटवाईवाडी ग्रामपंचायत -प्रदीप रामराव आहेर (सर्वसाधारण ),भऊर ग्रामपंचायत -श्रावण विठ्ठल पवार (सर्वसाधारण ) हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत . तर कनकापूर तीन ,मटाने एक या रिक्त जागांवर अर्ज प्राप्त न झाल्याने हि पदे रिक्त आहेत . उर्वरित तिसगांव अनु जमाती महिला राखीव आणि मेशी येथे सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक घेण्यात येत आहे . अशी माहिती तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम