Nashik Political | अमित ठाकरे नाशिक मधून विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

0
64
#image_title

Nashik Political | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो. 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहरातील चार पैकी तीन आमदार निवडून आले होते त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं आता कंबर कसली आहे. राज ठाकरेंचं नाशिकवर असलेले विशेष प्रेम अनेकवेळा दिसून आले आहे. आपल्या पक्षाची घोषणा देखील त्यांनी नाशिकमध्येच केली होती. आता त्यांचे सुपुत्र व पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चां होत असून ते या निवडणुकीत नाशिक मधून रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Nashik Politics | नाशकात शिवस्वराज्य यात्रेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं

राज ठाकरे कडून नाशिकच्या जागांचा आढावा

यावर्षीचा पक्षाचा वर्धापन दिन देखील नाशिकमध्ये साजरा करण्यात आला होता. मनसेने विधानसभेसाठी मैदानात उतरण्याची तयारी तेव्हापासून सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु अमित ठाकरे कुठून निवडणूक लढवणार हे अजूनही निश्चित झाले नसून ते नाशिक मधून उमेदवारी करू शकतात अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता स्थानिक मानसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 जागांचा आढावा घेतला असून पदाधिकाऱ्यांकडून अहवाल घेतले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी नुकताच राज्याचा दौरा केला असून या दौऱ्यात त्यांनी काही उमेदवारांची घोषणा केली. या दौऱ्यानंतर त्यांनी मुंबईत दोन दिवसांपूर्वी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये नाशिक बरोबरच मुंबई, ठाणे, पुणे, ज्ञग्रामीण व शहराच्या विधानसभा जागांचा त्यांनी आढावा घेतला आहे.

Nashik Politics | नाशकात जागावाटपावरून महायुती पाठोपाठ मविआत देखील रस्सीखेच

मनसेचे नाशिक वर लक्ष

2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकूण 13 आमदार निवडून आले होते. ज्यामध्ये नाशिक शहरातील चार पैकी तीन आमदारांचा समावेश होता. यानंतर 2012 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे जवळजवळ 40 नगरसेवक निवडून आले. परंतु पक्षातील गटबाजीमुळे त्यावेळी पक्षाची मोठी हानी झाली होती. आता मात्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने पुन्हा एकदा नव्या उमेदीने तयारी सुरू केली असून राज ठाकरेंबरोबर अमित ठाकरे देखील सतत नाशिक वर लक्ष देत आहेत. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीमध्ये मनसे पुन्हा चमत्कार करणार का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here