पंचायत समितीचे ‘वाहन’ चालक विना ‘धूळखात’ ; प्रशासन मात्र उदासीन

0
54

द पॉईंट प्रतिनिधी : देवळा येथील पंचायत समितीच्या सभापतीसह गटविकास अधिकाऱ्यांच्या वाहनाला चालक नसल्याने गेल्या तीन महिन्यापासून सदर वाहन धूळ खात पडून आहे. याकडे मात्र प्रशासन जाणून बुजून प्रयत्न करते की काय ही शंका उपस्थित राहते.

आज संतप्त झालेल्या सभापतींनी थेट आंदोलनाचा इशारा दिला असून, स्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जर अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे अडवणूक होत असले तर दाद कुणाकडे मागावी, असा यक्ष प्रश्न उपस्थित झाल्याने अशा प्रकारच्या इशाऱ्याने पदाधिकाऱ्यांना घराचा आहेर मिळाला.

देवळा पंचायत समितीचे वाहन गेल्या तीन महिन्यापासून चालक अभावी धूळ खात पडून आहे. पंचायत समिती,जिल्हा परिषद मध्ये होणाऱ्या मासिक मिटिंगसाठी जाण्या येण्यासाठी वाहन नसल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदे कडे चालकाची मागणी करून देखील याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सभापतींनी केला असून, याकामी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन तक्रार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

पंचायत समिती मार्फत अनेक योजना राबविल्या जातात. तसेच इतर शासकीय कार्यक्रमात उपस्थिती लावावी लागते याकामी वाहन खाजगी वाहन नसल्याने आचर्य व्यक्त केले जात आहे . सभापतींप्रमाणेच गटविकास अधिकारी यांना देखील वाहन अभावी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असून, पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व लाभार्थ्यांना माहिती आदी कामांसाठी ग्रामपंचायतींना भेट देण्यासाठी दुचाकीवरून जावे लागत आहे. ही अत्यंत शोकांतिका असून,वरिष्ठांनी याची तात्काळ दखल घ्यावी व वाहन चालक उपलब्ध करुन द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सभापती शांताबाई पवार, उपसभापती धर्मा देवरे ,सदस्य सरला जाधव, कल्पना देशमुख, सुरेखा निकम, केशरबाई आहिरे यांनी दिला आहे.

– पत्रकार सोमनाथ जगताप


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here