नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : प्रहार उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यास तालुक्यातून हजारो संख्येने शेतकरी उपस्थित होते याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून हवामान तज्ञ पंजाबराव डख, युट्युब स्टार गणेश फरताळे उपस्थित होते.
या प्रसंगी शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांचे तळागाळातील प्रश्न गणेश फरताळे यांनी त्यांच्या भाषणातून मांडले व पंजाबराव यांनी हवामाना विषयी मोलाचे मार्गदर्शन ह्या असंख्य शेतकऱ्यांना केले अभिष्टचिंतन सोहळ्याच्या आभार व्यक्त करताना गणेश निंबाळकर यांनी आपले मत मांडताना शेतकऱ्यांची कशी पिळवणूक होत आहे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत असताना मग ते विद्युत वितरण कंपनी असो किंवा भूमिअभिलेख या दोन्ही विभागांवर ताशेरे ओढले, महावितरणने दाखल केलेल्या 353 कलमान्वये खोट्या गुन्ह्याबाबत बोलताना निंबाळकर म्हणाले आमच्या पाठीशी असंख्य शेतकरी उभा आहे आणि वेळप्रसंगी यातील दहा टक्के जरी शेतकरी आमच्या सोबत तुमच्या कार्यालयावर आला ना तर मात्र तुमची खैर नाही असे यावेळी निंबाळकरांनी ठणकावून सांगितले आणि उपस्थित जनसमुदायाचा हा पाठिंबा बघून हीच आमची खरी शेतकऱ्यांची ताकद आणि हे आम्ही आज रोजी दाखवून दिल्याचे सांगितले भविष्यात शेतकऱ्यांच्या काडीलाही धक्का लागू देणार नाही अशी यावेळेस निंबाळकरांनी जणू शपथ घेतली.
प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विष्णू थोरे व राम बोरसे यांनी केले यावेळी समस्त शेतकऱ्यांसोबत तालुक्यातील असंख्य प्रहार सैनिक आणि सर्वच पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, प्रहार जिल्हाप्रमुख शरद शिंदे, प्रहार पक्ष निरीक्षक सुरेश तात्या उशीर, चांदवड प्रहार जनशक्ती तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण, प्रहार शेतकरी संघटना तालुका प्रमुख राम बोरसे, चांदवड रुग्णसेवा तालुकाप्रमुख रेवन गांगुर्डे, दिव्यांग क्रांती तालुका अध्यक्ष सोमनाथ जाधव, शेतकरी संघटना उपतालुका प्रमुख गणेश तिडके, प्रहार जनशक्ती पक्ष उपतालुका प्रमुख कैलास पगार, तालुका संपर्क प्रमुख शिवा गुंजाळ, येवला तालुका प्रमुख हरिभाऊ महाजन, बागलान तालुका प्रमुख गणेश काकुळते, साहेबराव गांगुर्डे, चंद्रभान गांगुर्डे, संदीप देवरे, किरण चरमळ, सुनील पाचपुते, अमोल फरताळे, शंकर गायके, संदीप महाराज जाधव, विनोद जाधव, प्रवीण जाधव, मिनीनाथ निखाडे, चंद्रकांत जाधव, शांताराम घुले, हरिभाऊ सोनवणे, प्रवीण लबडे, बापू खांदे, संदेश आहेर, रवि आहेर, वैभव गांगुर्डे, गौरव पवार, गोरख ढगे, किरण काळे, गणेश गांगुर्डे, विक्रम ठाकरे, बापूसाहेब भोकनळ, भगवान पाचोरकर, संतोष आंबेकर, विजय तिडके, संदीप चव्हाण, बापू पवार, पुंडलिक पवार, निळोबा बोरसे, प्रशांत ठोंबरे, शिवनाथ ठोंबरे, समाधान ठोंबरे, समाधान खैरे, महेश ठोंबरे, मधुकर ठोंबरे, सुनील गलांडे, पवन सोनवणे, योगेश गांगुर्डे, धर्मेंद्र गांगुर्डे, महेश गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, पिंटू तिडके, दीपक चव्हाण, कुणाल घोरपडे, सुरेश आहिरे, तुकाराम अहिरे, अजित कोल्हे, प्रवीण झाल्टे, संतोष कोल्हे, भाऊसाहेब पवार, बाबासाहेब खताळ, व असंख्य प्रहार सैनिक आणि शेतकरी उपस्थित होते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम