Deola | देवळा तालुक्यातील पाणी प्रश्नासह इतर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील – खा. भगरे

0
118
Deola
Deola

Deola | देवळा तालुक्यातील पाणी प्रश्नासह इतर समस्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केले. गुरुवारी दि.१२ रोजी खासदार भगरे यांनी विठेवाडी विकास संस्थेला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. येथील विकास संस्थेच्या कार्यालयात भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे चेअरमन कुबेर जाधव, व्हा. चेअरमन कैलास कोकरे, जेष्ठ संचालक पि.डी निकम, संजय सावळे, सचिव संजय निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा शहराध्यक्ष दिलीप आहेर व इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन कुबेर जाधव यांनी खासदार भास्कर भगरे यांच्याकडे विठेवाडी, सावकी शिवारातील जुन्या ब्रिटिश कालीन बंधाऱ्यांची दुरावस्था झालेली आहे. २० वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्री स्व. ए.टी पवार यांनी लाखो रुपयांची आर्थिक मदत मिळवुन दिली व स्वतः दुरुस्त केलेल्या बंधाऱ्याचे जल पुजन व उद्घाटन करण्यात आले होते.

Deola | ‘पाणी नाही तर मतदान नाही..’; देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिक आक्रमक

जुन्या अशा ६० ते ६५ वर्षांपूर्वी बांधकाम झालेले असल्याने या बंधाऱ्यांना ठिकठिकाणी भगदाड पडलेले आहेत. पाणी पुरवठा योजना या बंधाऱ्यातून आहेत. मात्र, बंधाऱ्यांची दुरावस्था झाल्यामुळे शेतीसाठीही पाणी नसते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची अवस्था ही “धरण उशाला व कोरड घशाला” अशी झालेली आहे. या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी यावेळी खा. भास्कर भगरे यांच्याकडे करण्यात आली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here