Deola | शरदराव पवार पतसंस्थेच्या वतीने सभासदांना 10 % लाभांश जाहीर

0
44
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील शरदराव पवार पतसंस्थेच्या वतीने सभासदांना यावर्षी १०% लाभांश देण्यात येणार असून, सोने तारणावर ८.९०% दरानुसार कर्ज पुरवठा केला जाणार आहे. याचा सभासदांनी तसेच इतर ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन योगेश आहेर यांनी केले. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दि.७ रोजी खेळीमेळीच्या वातावरण पार पडली. यावेळी ते बोलत होते.

Deola | शरदराव पवार पतसंस्थेचा वर्धापन दिन उत्साहात

याप्रसंगी सभासद पाल्यांच्या व विविध क्षेत्रात निवड झालेल्या सभासद व हितचिंतकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन योगेश आहेर, व्हा. चेअरमन हिरामण आहेर, संचालक तुळशीराम आहेर, बाळासाहेब मगर, अतुल आहेर, नानाजी आहेर, नितीन नवले, लीना आहेर, वनिता शिंदे, पुंडलिक आहेर, शंकर बच्छाव, नानाजी आढाव आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहवाल वाचन व्यवस्थापक प्रमोद देवरे यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा. सतीश ठाकरे यांनी केले. सभा यशस्वीतेसाठी सचिव बापू आहेर, रमेश जाधव, भिला सोनवणे, योगेश आहेर, तुषार मोरे, संदीप आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here