Nashik : सुरगाणा तालुक्यात आठवडाभर सततच्या पावसाने नार, पार, अंबिका, तान, मान, वाझडी, कावेरी या नद्यांना पूर आले असून काही ठिकाणच्या नदीकाठावर असलेल्या भात शेतीचे नुकसान झाले तसेच पावसाच्या संततधारीमुळे सर्वाधिक फटका घरांना बसला असून अनेक ठिकाणी भिंती कोसळून घरांचे अतोनात नुकसान झाले आहे.
Deola | बालाजी पतसंस्थेने जिंकली नागरिकांची विश्वासार्हता; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींनी केले कौतुक
पावसामुळे शेतीसोबत घरांचेही नुकसान
बोरचोंड येथील अनिल नरेश कनसे, पिळुकपाडा येथील खंडू चंदवाघमारे, करंजुल (क) येथील रवींद्र चौधरी, अंबोडे येथील वसंत नारायण भोये, यांचे भिंतघरपैकी चावडीचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे नुकसान झाले आहे. तर गोकुळ येथील अर्जुन घुले यांच्या घराची भिंत पडून सिमेंट पत्रांचे नुकसान झाले आहे. निंबरपाडा खोकरी येथील नारायण राऊत, हुबळी येथील यशवंत सोमा गुंबाडे, कुकूडमुंडा येथील रखमाबाई गोतुर्णे, मनखेड येथील भास्कर ब्राह्मणे, चिंचले येथील चंदू पालवा, हिरपाडा येथील सोमनाथ गवळी, सुरगाणा शहरातील देवदास भोये, हतगड येथील पारिबाई कवर यांच्या घरांची भिंत पडली आहे यातील काही जणांच्या राहत्या घरांची पडवी कोसळून आतोनात नुकसान झाले आहे.
Deola | उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने देवळा तालुक्यातील गावांना मोठा दिलासा
तलाठींना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश
मागील आठवड्यापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून नदीकाठच्या शेतीचे नुकसान झाले आहे. परंतु घरांचे देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याबाबत संबंधित तलाठींना तहसीलदार रामजी राठोड यांनी लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. अशी मागणी ही केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम