मंत्री भुसे यांची चांदवड शिवसेना कार्यलयाला भेट

0
59

नितीन फंगाळ

चांदवड प्रतिनिधी : दादा भुसे कृषिमंत्री तथा माजी सैनिक कल्याणमंत्री यांनी शिवसेना चांदवड तालुका संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देऊन शिवसेनेच्या कामाचे कौतुक केले. शिवसेना संपर्क कार्यालयातून जनतेच्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन मंत्री महोदयांनी उपस्थितांना केले.

शिवसेना शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मा.तहसिलदार पाटील साहेब यांना बोलावुन नागरिकांच्या समस्यांचे निरासरण केले व शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख ,संदिप (तात्या) उगले शिवसेना उप-शहरप्रमुख सचिन (गुड्डू) खैरनार शिवसेना संघटक, प्रसाद प्रजापत सुनिल बागुल, शाताराम भापकर जेष्ठ शिवसैनिक विष्णु कोतवाल, विकी गवळी, धनुभाऊ पाटील आदींसह सरपंच व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here