द पॉईंट नाऊ ब्युरो : देवळा नगरपंचायत रणधुमाळीत आज नाट्यमय घडामोडी घडल्या यात भाजपाने शिवसेनेचे शहराध्यक्ष पळवून सेनेची गोची केली, या प्रकारामुळे मनोज आहेर यांच्याबद्दल शिवसैनिकांनी मात्र तीव्र निषेध केला आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात असलेल्या महाविकास आघाडीला तालुक्यात सुरुंग लागला असून शिवसेनेने होती नव्हती गेलेली अब्रू वाचवण्यासाठी थेट राष्ट्रवादीच्या विरोधात नानाजी आढाव यांना उभे केले आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे देखील उमेदवार पक्षाच्या AB फॉर्मवर उभे केले आहेत.
वॉर्ड क्रमांक 5 मध्ये शिवसेनेचे नानाजी आढाव यांना उमेदवारी देतांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला, मात्र आढाव यांनी पक्षाच्या तिकिटासाठी वरिष्ठ नेत्यांना साकडे घालत, उमेदवारी मिळवली, इतर वॉर्डात सेनेला उमेदवार नसतांना याठिकाणी आढाव पक्षाकडून आग्रही असतांना पक्षाने इतका विलंब का केला ही देखील गंभीर बाब आहे. आढाव यांच्या रूपाने सेनेला आक्रमक चेहरा या वॉर्डात मिळाला असून सेनेसाठी एवढी एकच बाब सकारात्मक आहे. या वार्डात राष्ट्रवादी विरोधात सेनेने उमेदवारी केल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चिन्हे आहेत. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने वॉर्ड ,2,3,9,15 याठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. पक्षाचा अधिकृत उमेदवार माघार घेणार का हे बघणं महत्त्वाचे आहे.
दिवसभरात भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी सिक्सर मारत धनुष्य बाणाला आपलेसे करून त्यांना फुलानी सजवले, यामुळे तालुक्यातील पंचक्रोशीत नानांच्या नानागिरीचे कौतुक होत आहे, तर निवडणूक कशी एकतर्फी होतेय हे दाखवण्यात, वातावरण निर्मिती करण्यात भाजपा नेतृत्व यशस्वी झालेत.
सुरवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक महाविकासआघाडी व शिवसंग्रामने एकत्रीत येऊन चांगले वातावरण निर्मिती केली होती मात्र हे नानांनी हेरले अन या वातावरणाची आज हवा काढून घेतली. यामुळे महाविकासआघाडी नेत्यांची दाणादाण उडाली आहे. अनेक नेत्यांची देखील झोप उडाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम