देवळा प्रतिनिधी : देवळा – नाशिक राज्यमार्गावर आज मंगळवारी (दि 7) रोजी सकाळी न्यूज पेपर वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात घडला असून यात वाहन चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे . मात्र या अपघाताची देवळा पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची माहितीची नोंद नसल्याचे दिसून आले .

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी( दि ६) रोजी नाशिकहून देवळ्याच्या दिशेने न्यूज पेपर घेऊन येणाऱ्या वाहनाला देवळ्याच्या नजिक असलेल्या हॉटेल गोदावरीच्या परिसरात अपघात झाला. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, वाहन चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघात स्थळी न्यूज पेपर अस्ताव्यस्त पडलेली आढळून आले. मात्र या अपघाताची साधी खबर देखील देवळा पोलीस ठाण्यात नसल्याने आचर्य व्यक्त करण्यात येत आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम