नाशिक प्रतिनिधी: देशात कोरोनाच्या कारणास्तव अनेकदा पुढे ढकल्या गेलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांसह प्रशासनाची तयारी सुरू आहे. ही परीक्षा नाशिक मध्ये देखील होत असून त्यासाठी आज जिल्हाधिकारी यांची बैठक झाली त्यात आयोगाच्या मानांकनानुसार जिल्हा प्रशासन ही परीक्षा यशस्वी करून दाखवेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आयोगाचे उपसचिव एस. के. गुप्ता यांना दिली. यामुळे नाशिकवरती मोठी जबाबदारी यावेळेस असणार आहे.
UPSC च्या परीक्षा ठराविक शहरात होत असतात मात्र यावेळी नाशिकमध्ये पहिल्यांदाच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सिविल सर्व्हिस पूर्व परीक्षा 10 ऑक्टोबरला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोगाचे उपसचिव एस. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्वाही दिली.
या प्रशिक्षणाकरिता केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अवर सचिव दीपक पंत, उज्वल कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी यांच्यासह प्रशिक्षणासाठी निश्चित करण्यात आलेल्या बारा केंद्रांचे प्राध्यापक उपस्थित होते.
परीक्षेसाठी नाशिकमध्ये एकूण 12 केंद्रे
शहरात होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन 12 केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. साधारण 4 हजार 400 विद्यार्थी नाशिक केंद्रावर परीक्षा देणार आहेत. विशेष बाब म्हणजे परीक्षेसाठी दिव्यांग परीक्षार्थींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश गुप्ता यांनी दिले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम