द पॉईंट नाऊ ब्युरो : नगरपंचायत रणधुमाळीत नामनिर्देशपत्र दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची मोठया प्रमाणात धावपळ होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षाचे AB फॉर्म कोणाला मिळणार याची उत्सुकता देखील शिगेला पोहचली आहे. संशयाने अन अफवांनी अनेक उमेदवारांची झोप उडाली आहे.
देवळा सार्वत्रिक निवडणुकीत रणसंग्राम बघायला मिळतोय, यात भाजपा विरुद्ध महाविकासआघाडी व मित्रपक्षात होणार आहे, महाविकास आघाडीचे जागा वाटप देखील अद्याप झालेलं नसल्याने महाविकास आघाडी टिकणार का याकडे लक्ष आहे कारण राष्ट्रवादीहा मोठा पक्ष असतांना देखील काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी पाच जागा मागितल्या आहेत, तर मित्रपक्ष शिवसंग्रामने देखील 5 जागा लढवणार असल्याचे घोषित केले. 17 पैकी 15 जागांची मागणी इतर पक्षांनी केल्याने राष्ट्रवादी 2 जागांवर कस लढणार हा पण एक संशोधनाचा भाग आहे. यामुळे रात्रीत नेमका काय तोडगा निघाला यावर महाविकास आघाडी होणार की नाही, शिवसंग्राम नेमकं कोणासोबत राहणार हे बघणं महत्वाचे आहे. बंडखोरीचे ग्रहण मात्र दोन्ही बाजूंना असल्याने अनेक वॉर्डात निकाल धक्कादायक असू शकतात.
माघारी पर्यंत कोणता पक्ष पुढाकार घेऊन बंडोबांना थंड करतो यावर अधिकृत उमेदवारांचे भविष्य अवलंबून असणार आहे.
आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत, कालपर्यंत 33 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. यामुळे आज देखील जास्तीत जास्त अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. यात प्रशासनाचा कस लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम