सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | वडाळे (ता.देवळा) येथील माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र केदारे यांच्याकडून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गावातील राहुल सोनवणे व सानिका केदारे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी केदारे यांनी सांगितले की, “पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत टाकावे. तिथूनही चांगले ज्ञान घेता येऊ शकते, इच्छाशक्ती असल्यास यश मिळणारच. आपल्यासमोर असलेली ही आपल्याच खेड्यातील रहिवासी असलेले दोन मुलं राहुल सोनवणे व सानिका केदारे यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली. नव्याने निवड झालेले सोनवणे व केदारे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत मोठ्या मेहनतीने व चिकाटीने प्रयत्न करत यशाला गवसणी घातली”.
Deola | देवळा अभिनव व जनता विद्यालयात लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक हिरामण शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण हे उत्कृष्ट असून, येथील अनेक विद्यार्थी हे विविध ठिकाणी मोठ्या पदावर गेलेले आहेत. अनेक अधिकारी देखील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतीलच असतात. ज्याप्रमाणे केदारे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना व यांची मदत केली ती खरोखर कौतुकास्पद आहे”.
कार्यक्रमाची प्रास्ताविका शाळेचे शिक्षक सुजित आहेर यांनी केली. यावेळी अशोक सोनवणे, पुंडलिक केदारे, केदा केदारे, समाधान शिंदे, अशोक शिंदे, शैला सोनवणे, मुन्ना शिंदे, गोतमा शिंदे, आकाश केदारे, मुख्याध्यापक श्रीमती सावकार, लिपिक शुभानंद देवरे आदी उपसथित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम