Satana vidhansabha | रघु नवरे यांच्याकडून बागलाण विधानसभेसाठी तयारी

0
39
Satana
Satana

सटाणा :  राज्यात लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, बागलाण विधानसभा मतदार संघ हा राखीव असल्याने येथे दिवसागणिक इच्छुक उमेदवारांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान, यात एकलव्य भिल्ल सेनेचे संस्थापक अध्यक्ष रघु नवरे यांनी आपण बागलाण विधानसभा मतदार संघात इच्छुक उमेदवार असल्याचे जाहीर केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी निसटता पराभव केला.

यानंतर या मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बारसे, माजी आमदार संजय चव्हाण यांनी संपूर्ण मतदारसंघात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला असून, यात मूळचे बागलाण तालुक्यातील असलेले व देवळ्याचे माजी सरपंच तसेच एकलव्य भिल्ल सेनेचे संस्थापक अध्यक्ष रघु नवरे यांनी देवळासह बागलाण तालुक्यात कार्यकर्त्यांची मोट बांधली असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक उमेदवार आहेत.

Dindori | भास्कर भगरे यांना एकलव्य भिल्ल सेनेचा पाठिंबा – रघु नवरे

दरम्यान, त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. नवरे हे देवळ्याचे माजी सरपंच असून, त्यांच्या सुविद्य पत्नी देखील देवळा नगरपंचातीच्या नगरसेविका होत्या. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. गोरगरीब, सर्वसामान्य लोकांच्या कामांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी नवरे यांनी आपले संबंध अबाधीत ठेवले आहेत. या माध्यमातून त्यांचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here