सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मविप्र संचलित अभिनव व जनता विद्यालय देवळा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनीष बोरसे होते. अध्यक्ष व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी ऐश्वर्या लाडे, सार्थक देवरे, मनस्वी पाटील, तेजस दिवटे, आरोळी आहेर, पुष्कर जाधव, ईश्वरी आहेर, ऋतुंबरा बुरगुडे, रिया आहेर, प्रगती चव्हाण, कनक दुसाने, मानस वाघ यांनी लोकमान्य टिळक व शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
Deola | लाडकी बहीण योजनेचा महिलांनी लाभ घ्या; विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका – आ. आहेर
तर शिक्षकांच्या वतीने शैला भामरे, पुनम बाविस्कर आदिंनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक मनीष बोरसे यांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांना समजावुन सांगितला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थिनी समीक्षा शिंदे व स्नेहल पवार यांनी केले. तर मयूर गुंजाळ याने आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे सहकार्य लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम