देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी ( दि ६) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवसा अखेर तीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सी . एच देशमुख यांनी दिली . (दि ३) रोजी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते . आज अखेर ३३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले .
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या मंगळवार (दि ७) पर्यंत असून ,नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे . अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी सी एच देशमुख यांनी दिली . देवळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळा शहरात राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, पुढील रणनीती ठरविण्यासाठी राजकीय पक्षाच्या गुप्त बैठका घेतल्या जात असून, भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम