नाशिक : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली कंबर कसली आहे. अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारीची अपेक्षा असून, त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये कामं, भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका लावला आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत अडचणीत सापडलेले नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचे कॉंग्रेस आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या कॉंग्रेस आमदारांमध्ये खोसकर यांचेही नाव असल्यामुळे त्यांच्यावर सध्या कारवाईची टांगती तलवार आहे. यातच आता त्यांच्या मतदार संघातूनच त्यांच्यासाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
Congress | इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांचाही काँग्रेसला रामराम..?
Igatpuri Constituency | आयात उमेदवार दिल्यास बाहेरचे पार्सल परत पाठवू
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीत स्थानिक भूमिपुत्रांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत या निवडणुकीत आयात केलेला उमेदवार दिल्यास त्याला सर्व ताकदीनिशी पाडू आणि बाहेरचे पार्सल परत बाहेर पाठवू, असा इशारा स्थानिक भूमिपुत्रांकडून देण्यात आला. कोणत्याही पक्षाने इगतपुरी मतदार संघासाठी तिकीट देताना येथील स्थानिक उमेदवारालाच तिकीट द्यावे, अशी मागणी यावेळी स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात आयात विरुद्ध स्थानिक असा संघर्ष पाहायला मिळणार हे नक्की. (Igatpuri Constituency)
Congress MLA | आमदार खोसकरांचा मोठा गौप्यस्फोट..!; म्हणाले,’..त्यांच्यामुळे आमदार नाराज’
प्रतिनिधी इगतपुरीचे वास्तव्यास नाशिकमध्ये
आमदार हिरामण खोसकर हे कॉंग्रेसचे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे (Igatpuri Assembly Constituency) आमदार आहेत. मात्र, ते इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रतिनिधीत्व करत असले तरी ते नाशिक (Nashik News) तालुक्यात वास्तव्यास आहेत. त्यामुळे आता कुठल्याही पक्षाने आयात उमेदवार दिल्यास त्यांच्या उमेदवाराला पाडू आणि आम्ही बाहेरचे पार्सल परत पाठवू, असा थेट इशारा स्थानिक भूमिपुत्रांनी यावेळी दिला.
यामुळे आता केवळ आमदार हिरामण खोसकर यांचीच नाहीतर माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) यांचीही डोकेदुखी वाढणार आहे. आधीच उमेदवारीची शर्यत आणि आता स्थानिकांचा विरोध यामुळे तिकीटासाठी इच्छुकांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम