सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | विठेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून सभासद व ग्रामस्थांच्या सोयीसाठी केंद्र सरकारच्या आर्थिक सहकार्याने येथे सोमवारी (दि.२२) रोजी सीएससी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. गावातील सभासद व ग्रामस्थांच्या सोयीसाठी इ-सुविधा केंद्र, ऑनलाईन सातबारा, झेरॉक्स, लाईट बिल भरणा, इत्यादी सुविधा या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. सोमवारी सकाळी संस्थेच्या सर्व संचालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदर केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
Deola | देवळा येथे दशनाम गोसावी समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा
यावेळी संस्थेचे चेअरमन कुबेर जाधव, व्हा. चेअरमन कैलास कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब सोनवणे, प्रशांत निकम, पी.डी.निकम, महेंद्र आहेर, अभिजित निकम, तानाजी निकम, शशी निकम, सुनंदा निकम, सुनिता निकम, जिभाऊ बोरसे, संजय सावळे, तकदिर कापडणीस, भिका शेळके हे उपस्थित होते. ह.भ.प. माधव महाराज, बापु शिंदे, दिलीप निकम, भास्कर निकम, विठोबा सोनवणे यांच्या हस्ते फित कापुन सिएससी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
ग्रामपंचायत सदस्य ईश्वर निकम, राहुल निकम, राजेंद्र निकम, विलास निकम, सुभाष निकम, शिवाजी निकम, माणिक निकम, रामदास निकम, शंकर निकम, भालचंद्र निकम, प्रविण निकम, मधुकर वाघ, रविंद्र वाघ, सतिश निकम, योगेश निकम, रावसाहेब निकम, यांच्यासह सचिव संजय निकम, सुभाष निकम, शुभम निकम आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कुबेर जाधव यांनी उपस्थित सभासद व ग्रामस्थांचे आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम