द पॉईंट नाऊ ब्युरो ; देवळा नगरपंचायत रणधुमाळी आता रंगतदार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत, सुरवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक ही आता बदलते स्वरूप घेत आहे. यात भाजपा तर्फे इच्छुकांची गर्दी प्रत्येक वॉर्डात होती तर राष्ट्रवादीला अनेक वॉर्डात उमेदवार नव्हते अशी परिस्थिती सुरवातीला निर्माण झालेली मात्र, उदयकुमार आहेर यांनी व्हिडीओ प्रसिध्द केल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. व एकतर्फी वाटणारी निवडणूक दुतर्फा झालेली आहे.
वॉर्ड क्रमांक 10 हा सर्व्यात जास्त चर्चेत असणाऱ्या वॉर्डमधील एक आहे. या वॉर्डात भाजपा तर्फे अशोक आहेर, अतुल पवार, करण आहेर हे इच्छुक असल्याने भाजपाने तिकीट कोणाला सोडावे याची पंचाईत झाली आहे, यामुळे चर्चा अशीदेखील आहे की पक्षाचे तिकीट न देता निवडणूक लढवावी. तर विरोधकांना मात्र उमेदवार कोणीही नसल्याने थेट उदयकुमार आहेर यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वातावरणात बदल झालेला आहे, हे वॉर्ड तस ज्याला ‘कुबेर अन लक्ष्मी’ प्रसन्न असेल त्याच्यासाठी फायद्याचं आहे, मात्र उदयकुमारांनी या आगीत उडी टाकण्याचा निर्णय कितपत योग्य राहील हे महत्त्वाचे आहे.
भाजपा तर्फे इच्छुकांचा विचार केल्यास अशोक आहेर हे भाजपचे जुने नेते, मात्र जनतेत अशी चर्चा आहे की ते भाजपा स्थानिक नेतृत्वावर नाराज होते, त्यांचा पक्ष निष्ठतेवर देखील अनेक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केलेत. सार्वजनिक ठिकाणी बोलतांना त्यांनी थेट भाजपा नेत्यांना टार्गेट केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तर दुसऱ्या बाजूला करणं आहेर हा युवक देखील मैदानात आहे, मी इतक्या दिवस पक्षाचे कार्यकर्ता म्हणून काम केले हे मला न्याय मिळायला हवा अशी त्याची भावना आहे, सर्व निर्णय त्यांनी भाजपा नेतृत्वावर सोपवले आहेत. मात्र तिकीट नाही मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी देखील ठेवली आहे. तर अतुल पवार हे भाजपाचे व नानांचे निकटवर्तीय आहेत, गेल्यावेळी त्यांनी अश्विनी उदयकुमार आहेर यांचा पराभव करून विक्रम केला होता. या अशा अनेक कारणांनी हे वॉर्ड त्यांच्यासाठी महत्वाचे आहे.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी व शिवसंग्राम करण आहेर यांना गळ घालत असल्याची माहिती आहे, मात्र करण आहेरने अद्याप राष्ट्रवादी व शिवसंग्रामला आपला निर्णय नकारात्मक कळवलेला असल्याची माहिती आहे.
उदयकुमार आहेरांची उमेदवारी राजकिय आत्महत्या ठरणार का ?
वॉर्ड क्र.10 मध्ये जातीय समीकरण वेगळे असल्याने निष्ठतेला अथवा प्रमाणिकपणाला या वॉर्डात फारसा थारा नाही. यात भाजपाचे तिन्ही इच्छुकांना ‘कुबेर’ अन ‘लक्ष्मी’ प्रसन्न आहे. या तुलनेत उदयकुमार आहेरांची परिस्थिती बिकटच आहे. त्यात जनतेत त्यांची प्रतिमा विरोधकांनी पद्धतशीर मलिन केली आहे, त्याचा फटका देखील त्यांना बसण्याची शक्यता आहे. यामुळे उदयकुमार आहेर यांनी ही रिस्क घेतांना आपली राजकीय आत्महत्या होणार नाहीना याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम