लासलगाव मध्ये पाच घरफोड्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
149

प्रसाद बैरागी
निफाड प्रतिनिधी : लासलगाव येथील वृंदावन ड्रीम सिटी या कॉलनीत एका रात्रीतून धाडसी पाच घरफोड्या झाल्याचा प्रकार घडला आहे. यात सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी चोरून नेतात पोबारा केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लासलगांव रेल्वे टेशन जवळ असलेल्या बायपास च्या शेजारील वृंदावन ड्रीम सिटी या कॉलनीत पाच ठिकाणी धाडसी घरफोड्या झाल्या यात एका बँकेचे क्लार्क योगेश भालेराव यांच्या इथे घरफोडी झाली यादरम्यान शेजारील सर्वांच्या बाहेरून कड्या लावून ही घरफोडी करण्यात आली यात तीन तोळे सोन्याची दागिने, चांदीच्या काही वस्तू तसेच चार-पाच हजार रोख रक्कम तर काशिनाथ रहाणे यांच्या येथून पंचवीस हजार रुपये रोख रक्कम आणि काही चांदीच्या वस्तू असा पावणेदोन लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेत पोबारा केला अन्य तीन ठिकाणी फक्त घरफोडी झाली या धाडसी घरफोडीची माहिती लासलगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र चोरटे धाडसी चोरी करून पळून जाण्यात यशस्वी झाल्यामुळे लासलगाव पोलिसांसमोर आता चोरीच्या घटना थांबवण्यासाठी या चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले.

चोरट्यांनी बंद असलेल्या घरांना लक्ष केले होते. लासलगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कर्मचारी करत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here