सोमनाथ जगताप – पतिनिधी : देवळा | केंद्र सरकारने 1 जुलै 2024 पासून फौजदारी कायदे सुधारित केले असून, त्यात तीन फौजदारी कायदे लागू केले आहेत. उदा – भारतीय न्याय संहिता 2023 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय सक्षम अधिनियम 2023 या सुधारीत कायद्यांची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून लागू होणार असून, ह्या संदर्भात जनजागृती व्हावी असे देवळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी आज रविवारी (दि 30) रोजी बैठकीत सांगितले.
यावेळी त्यांनी भारतीय न्याय संहिता 2023कलम 106(2) वगळता 1 – 7-2024 पासून प्रभावी, भारतीय साक्ष अधिनियम 2023 1- 7- 2024 पासून, प्रभावित भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 पहिल्या अनुसूचीमधील भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 106(2) संबंधित नोंदी मधील तरतुदी वगळता 1-7- 2024 पासून लागू होतील. याबाबत अधिकृत माहिती प्रसार माध्यमातून येणारच आहे. परंतु जनतेस याची सविस्तर माहिती होण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे असे त्यांनी तालुक्यातील पत्रकार, जेष्ठ नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम