प्रसाद बैरागी
निफाड/प्रतिनिधी : निफाड नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच दोन उमेदवारांनी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
निफाड नगरपंचायत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होऊन अकरा महिने अधिक झाले आहेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांनी नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. झाल्यानंतर निफाड नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांची लगीनघाई सुरू झाली. भावी व विद्यमान नगरसेवक आपापल्या प्रभागात उमेदवारी करण्यासाठी चांगलीच धावपळ करू लागले.
कागदपत्रांची जुळवाजुळव करून आजअखेर दोन उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. मात्र, अद्यापही कोणत्याही अधिकृत पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम