Deola | खर्डे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अनिल रामदास देवरे बिनविरोध

0
24
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  खर्डे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अनिल रामदास देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खर्डे विविध कार्यकारी सोसायटीचे मावळते चेअरमन रामदास गांगुर्डे यांनी आवर्तन पध्दतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी नवीन चेअरमन पदाच्या निवडीसाठी सोमवारी (दि. २४) रोजी दुपारी ११ वाजता सहायक निबंधक कार्यालयात सहकार अधिकारी वसंत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी चेअरमन पदी सर्वानुमते अनिल देवरे यांची निवड करण्यात आली.

Deola | देवळा महाविद्यालयाच्या ‘बांधिलकी’ चा पुणे विद्यापीठाच्या वतीने गौरव

यावेळी नूतन चेअरमन देवरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .याप्रसंगी समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी मावळते चेअरमन रामदास गांगुर्डे, संचालक सौ दिपाली जाधव, उत्तम थोरात, युवराज मोरे, भरत देवरे, वसंत जाधव, सचिव विजय शिंदे आदींसह सभासद उपस्थित होते. नूतन चेअरमन देवरे यांचे आमदार डॉ राहुल आहेर, राज्य फेडरेशन चे संचालक केदा आहेर, बाजार समितीचे माजी सभापतीबापू देवरे, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद मोरे, मधुकर देवरे, राहुल देवरे आदींनी अभिनंदन केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here