राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहास सौ.अनिता राजेंद्र नलगे मेमोरियल फाउंडेशन च्या वतीने लोखंडी कॉट व मॅटरेस देण्यास आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उद्योजक जालिंदर निंभोरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगरचे माजी काॕंग्रेस शहराध्यक्ष बबनराव बाराथे, सरपंच ताराबाई रतन बांबळे, उद्योगपती भास्करराव कापरे, जंजीरे, सौ.सुशिला भारितकर, अरुण भारीतकर, कोंडाजीराव भारीतकर, प्रमोद वैद्य, माजी प्राचार्य सी. जे. शेख, विनोद कांबळे, मोरे हे होते.
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज टाकेद येथे एस.सी. व एस.टी प्रवर्गातील मुलांचे वसतीगृह आहे. या सर्व मुलांना लाखो रूपये खर्च करून डबल माळ्याच्या पंधरा काॅट व गाद्या देण्यात आल्या. कोरोना काळात भारत सर्व सेवा संघ पाचेगाव या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ सौ. अनिता राजेंद्र नलगे मेमोरियल फाउंडेशन स्थापन करून प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबविले जातात. मागील वर्षी सुमारे 400 झाडे लावली व ती आजही सुस्थितीत आहेत.
या वर्षी टाकेद येथिल वसतीगृहातील सर्व मुलांना काॅट, गाद्या देऊन शालेपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी श्रीमती अरुणा सुरेशदादा नलगे, चेतन नारायण जठार, शलाका चेतन जठार, शशांक राजेंद्र नलगे, जयश्री पानसरे, भारती सपकाळ, हेमलता सपकाळ, प्रमोद वैद्य, सुधाकर पानसरे, राजू सपकाळ, अरुंधती कोरस्थाने, नितीन सपकाळ, आमोद नलगे, संगिता नलगे, नारायण जठार, सुधाताई जठार, अनेक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व अहवाल वाचन टाकेद विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम साबळे यांनी केले तर सर्व पाहूण्यांचे आभार चंद्रशेखर डोंगरे व अमोद नलगे यांनी मानले व प्रास्ताविक राजेंद्र झेंडे यांनी केले. या वेळी सर्व शेकडो विद्यार्थ्यांना नास्ता व पाहूण्यांना जेवणाची सोय करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी टाकेद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उद्योजक जालिंदर निंभोरे यांनी टाकेद विद्यालयास 51,000/- रूपये विकास कामासाठी देण्याचे घोषित केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम