नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा ; प्रांताधिकाऱ्यांना भाजपाचे निवेदन

0
15

नितीन फंगाळ,
चांदवड प्रतिनिधी : चांदवड – देवळा तालुक्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले असून यात शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे यामध्ये जवळपास ४०० हुन अधिक जनावरे चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघात मृत्यू होऊन जीवितहानी झाले आहे.

अनेक ठिकाणी दमदार पाऊस, खरिपाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे समजते त्यामुळे अनेक गावांत विस्कटलेली संसाराची घडी बघावयास मिळत आहे. अनेक संकटातून ही घडी सावरते न-सावरते तोच ऐन रब्बीतही अवकाळी पावसाचे थैमान घ्यातल्याचे दिसून येत आहे. अशा अस्मानी व बेमोसमी पावसाच्या व इतर संकटामुळे शेतकरी वर्गास या सर्व गोष्टीचा सामना करावा लागत आहे. द्राक्ष, कांदा,कड-धान्य पिके, भाजीपाला या सार्‍या पिकांवर संक्रांत आलीय. तर, दुसरीकडे जीवघेण्या थंडीने गारठून मुकी जनावरं प्राण सोडत आहेत.

गेल्या दोन दिवसांच्या आकडेवारीत जिल्ह्यात तब्बल १०५० हुन अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. हातावर पोट भरणारे मजूर, इतर व्यवसायिक, वीटभट्टी वाले व्यवसायिक, विजवीतरण कंपनीचे कोसळलेले पोल, जनावरांचा ओला झालेला चारा, कोंबड्याचा थंडी मुळे झालेला मृत्यू,पडलेली घरे, रस्त्यावर भटकंती करणारे गोर-गरीब, याच्या वर खूपच मोठे संकट आले आहे.

जनावरे मृत्यू झाल्याने शासकीय यंत्रणेमध्ये महसूल विभाग कर्मचारी व ग्रामसेवक तसेच स्थानिक शासकीय व निम-शासकीय कर्मचारी घरोघरी पोहचून पंचनामा करतात परंतु जनावरांचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांची संख्या कमी असल्याने त्यांना वेळोवेळी पोहचून पी.एम करणे श्यक्य होत नाही. मृत जनावरे आपल्या डोळ्यासमोर ठेऊन मोठ्या हिमतीने मृत जनावरांचे पंचनामे करे पर्यन्त मृत जनावरांना कुत्री खाणार नाही यासाठी शेतकरी सांभाळत असतो व त्याकडे बघून आपले दुःख सहन करतोय, हे सर्व सहन करण्यायोग्य नसून यासाठी अधिकारी कर्मचारी वर्गाने शेतकरी वर्गाने दिलेल्या फोटोवर विश्वास ठेवून किंवा फोन वर सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून, तसेच कोणीतरी एका शासकीय कर्मचाऱ्याने केलेल्या पाहणीवर विश्वास ठेवून त्यांना मदत करणे अत्यन्त गरजेचे आहे.

वरील सर्व आपत्कालीन गोष्टीचा परिपूर्ण असा विचार करून शेतकरी, व्यावसायिक, मजूर, व्यापारी, कष्टकरी व नुकसान झालेल्या व्यक्तीचे पंचनामे तात्काळ करावे व शासनाकडून झालेल्या नुकसानीचे शासकीय रक्कमे प्रमाणे कमी दिवसात तात्काळ मदत करावी अशी आमच्या वतीने आपणांस व शासनास विनंती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल यांनी केली यावेळी चांदवड येथील ,गणपत ठाकरे, महेश खंदारे, विशाल ललवाणी, बाळा पाडवी, मोतीराम खुटे, शरद खुटे, बाबाजी खुटे,योगेश खुटे, रमेश खुटे,पराग कासलीवाल, हे उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here