राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | “शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि भावनेला हृदयाकडे घेऊन जाणे म्हणजेच शिक्षण होय…” या व्याख्येनुसार बारशिगवे येथे जिल्हा परिषद नाशिक व लायन्स क्लब ऑफ जुहू यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा बारशिगवे या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, युवा नेते उदय सांगळे, लायन किमारी पटेल, लायन धर्मेश दिल्लीवाला, लायन केतन मेहता, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, पत्रकार राम शिंदे, सरपंच काशिनाथ कोरडे, हरिश्चंद्र चव्हाण, सरपंच अशोक बोराडे, उपसरपंच पोपट लहामगे, माजी मुख्याध्यापक चंद्रकांत लोहकरे, निवृत्ती आगीवले आदींसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. तर उदघाटक म्हणून लायन बिरेन काटवाला हे आपल्या सर्व टीमसह उपस्थित होते.
विकासपुरुष गोरख बोडके यांच्या प्रयत्नातून लायन्स क्लबने या शाळेच्या नूतन इमारतीचे काम केले आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नवीन कपडे, स्कूल बॅग, कंपास, वह्या पुस्तक, एलईडी स्क्रीन, संगणक किट यांचे वाटप करण्यात आले. “आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे” याच युक्ती प्रमाणे बारशिगवे शाळेसाठी सर्वच उपलब्ध झाले आहे. गावातील शाळांच्या विकासासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यायला हवे. मंदिराला वर्गणी देतांना लोक सढळ हाताने देतात. परंतु शाळेला वर्गणी देतांना लोक हात मागे घेतात, असे गोरख बोडके यांनी आपल्या भाषणात म्हटले.
Igatpuri | इगतपुरीत पहिल्या पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांकडून खरीपाच्या मशागतीला सुरुवात
Igatpuri | शाळेची एक वर्ग खोली कमी पडली, तर…
“शाळेची एक वर्ग खोली कमी पडली. तर, जेलच्या दोन खोल्या बांधाव्या लागतात” हे माजी दिवंगत प्राचार्य एम. नाईकवाडी यांचे विचार व्यासपीठावर विश्लेषित करण्यात आले. अंगणवाडी सेविका वर्षा चोथवे यांनी जनकल्यानी देह झीजऊनी लाजविलेस चंदना, कर्मवीर हो धर्मवीर हो लाख लाख वंदना..या कवितेला साद घालत करिते करिते आज शुभदिनी सुस्वागतम… या स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत व
दात्यांचे आभार मानले. शालेय विद्यार्थ्यांनी लेझीमने मान्यवरांचे स्वागत केले तर मुलगी शिकली प्रगती झाली जर प्रगती करायची असेल तर सर्व पालकांनी आपापले मुले प्रथम शाळेमध्ये पाठवले पाहिजे.
इगतपुरीतील ही सातवी शाळा आहे याचे आज लोकार्पण होत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी हा देशात अव्वल नंबर वन स्थानावर पोहचला पाहिजे. शहरात जे शिक्षण मिळते तेच ग्रामीण भागात मिळायला हवे यासाठी हा प्रयत्न आहे. शाळेला स्वच्छ ठेवायचे आणि सातत्याने अभ्यास करायचा हे दोन प्रॉमिस विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले, असे लायन्स क्लबच्या वतीने सांगण्यात आले. युवा नेते उदय सांगळे यांनी कार्यक्रम आयोजकांचे आभार मानले.
Nashik | एक कोटी चार लक्ष्य निधीची राष्ट्रीय पेयजल योजना कुचकामी
शाळेत या सुविधा उपलब्ध
१)दोन मजली सुसज्ज इमारतीचे बांधकाम
२)इयत्ता १ ली ते सातवी पर्यंत सात वर्ग खोल्या
३)सायन्स लॅब
४)मुख्याध्यापक कार्यालय
५)संगणक लॅब
६)स्पोर्ट साहित्य यात क्रिकेट फुटबॉल कॅरोम बोर्ड सह अन्य खेळांचे साहित्य
७)अंगणवाडी किचन
८)प्रत्येक वर्ग खोलित नेम प्लेट, टेबल, बेंच, खुर्च्या, ब्लॅक बोर्ड व एल सी डी स्क्रीन, पाणी फिल्टर उपलब्ध
इत्यादी सर्व साहित्य लायन्स क्लब जुहू यांनी विविध कंपन्यांच्या सी.एस.आर फंडातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारशिगवे याठिकाणी उपलब्ध करून दिले आहे. दरम्यान ग्रामीण आदिवासी बहुल भागातील ही एकमेव रोल मॉडेल शाळा तयार झाली असून याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. येणाऱ्या काळात येथील सर्वच भागातील शाळांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाणार असल्याचे लॉयन क्लबच्या वतीने व्यासपीठावर सांगण्यात आले. यावेळी
मुख्याध्यापक मारुती भवारी, मारुती धादवड, मारुती लोहकरे, रमेश भांगरे, शंकर घारे, श्रीमती. नीता जाधव, नामदेव लहामंगे, आदीसह विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
“लॉयन क्लब जुहू यांनी आमच्या आदिवासी ग्रामीण भागातील पहिली जि प शाळा अत्याधुनिक सुखसुविधांसाह रोल मॉडेल म्हणून उभी केली आहे अश्याच पद्धतीने अनेक कंपन्यांनी आपल्या सी एस आर फंडातून ग्रामीण भागातील शाळांचा कायापालट केला पाहिजे,”
– अशोक बोराडे (सरपंच, बारशिगवे)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम