Nashik Politics | भुजबळांचा सामान्य कार्यकर्ता राजकीय पुढाऱ्यांना ठरतोय वरचढ

0
36
Nashik Politics
Nashik Politics

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | समाजकारण म्हटले की, कोणत्याही शाळा महाविद्यालयात त्याचे शिक्षण मिळत नाही. त्यासाठी जमिनीवर उतरून तळागाळातील सामन्यातील असामान्य समाज घटकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या विवंचना सोडविण्याची आंतरिक तळमळ एक तर त्या कार्यकर्त्याला अवगत असावी लागते. नाहीतर सामाजिक गुण हे रक्तातच असावे लागतात. असेच काहीसे समाज परिवारात वावरत असतांना प्रत्येक समाज घटकांना न्याय देण्याचं काम राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांचा सामान्य कार्यकर्ता असलेले इगतपुरी तालुका समता परिषदेचे अध्यक्ष घोटी येथील दमदार युवा नेतृत्व शिवा काळे यांच्याकडून होतांना दिसत आहे.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ, मा. खा. समीर भुजबळ, दिलीप खैरे यांचा निष्ठावान धडाडीचा कार्यकर्ता म्हणून शिवा काळे यांची तालुकाभरात नव्हे तर नाशिक जिल्हाभर आज ओळख आहे. आजवरच्या जीवन प्रवासात सामन्यातील असामान्य कार्यकर्ता असणाऱ्या शिवा काळे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून राजकीय पटलावर नाव कोरण्याची नामी संधी निर्माण केली आहे. समाज परिवारातील दलित पीडित जेष्ठ निराधार वंचित अश्या प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचे काम काळे यांनी आजवर केले आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहे. त्याचप्रमाणे रस्ता पाणी आणि वीज या देखील समस्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शिवा काळे यांनी आजवर सातत्याने पाठपुरावा केला आहे.(Nashik Politics)

विधवा परीतक्त्या निराधार महिलांची पेन्शन असो अथवा जेष्ठ नागरिक विधवा अपंग निराधारांना पेन्शन योजनेचा लाभ देऊन मोठा आधार देणे असो, घर तिथे रेशनकार्ड, अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्गातील घटकांना घरकुल योजनेचा लाभ आजपर्यंत काळे यांनी मिळवून दिला. आपल्या कार्यशैलीच्या जोरावर शिवा काळे यांनी आजवर जे निवडून देणाऱ्या भल्या भल्या पुढाऱ्यांना करता आल नाही ते काम काळे यांनी आपल्या घोटी गावात सर्वाधिक घरकुले मंजुर करुन घेतली. SC, ST, OBC मागासवर्गीय नागरिकांना सर्वाधिक घरकुले मंजुर करून शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील जनतेच्या घराघरापर्यंत काळे यांनी पोहचवला.

जनतेसाठी सतत शासकीय दरबारी पाठपुरावा करणारा व विविध योजना प्रत्येक्ष अंमलात आणणारा जनसेवक म्हणून शिवा काळे प्रचलित आहेत. कोरोनाच्या संकटात देखील शिवा काळे यांनी जीवाची बाजी लावत आदिवासी गोरगरिबांच्या रक्षणासाठी फ्रंट लाईन वर्कर म्हणून समाजाचे देणं म्हणून मदतीचा हात पुढे करत अविरत सेवा बजावली. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड सह रेमडेसीवीर, रुग्णवाहिका, हॉस्पिटल, वॅक्सिन, जीवनावश्यक वस्तू, आरोग्य शिबिरे, समाजप्रबोधन समाजपयोगी उपक्रम, सामाजिक सांस्कृतिक कार्यात सहभाग आदी सेवा त्या काळात काळे यांनी स्थानिक जनतेला उपलब्ध करून दिल्या.(Nashik Politics)

सध्या घोटी येथे महिला सक्षमीकरण उपक्रमासाठी श्री काळे यांनी दोन हात वर करत हिरहिरिने सहभाग नोंदवला असून घोटी येथे त्यांच्या प्रयत्नांतून महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर क्लास व शिवण क्लास सुरु करण्यात आले आहेत.यासोबतच महिला बचत गटांसाठी पंचायत समिती जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा करत रोजगाराभिमुख नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा शिवा काळे यांनी सध्या घोटी गावात धडाका लावला आहे.आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर श्री काळे यांनी तालुक्यात इतरत्र पुढाऱ्यांपेक्षा स्वतःची एक वेगळी आगळी अशी प्रामाणिक सच्चा समाजसेवक अशी ओळख निर्माण केली आहे.

आजपर्यंत तालुक्यातील जनतेने अनेकांना सदस्य सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य सभापती, जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार केले परंतु लोकप्रतिनिधी यांच्या विकास कामाच्या तुलनेत कोणत्याही पदावर लोकप्रतिनिधी नसतांना सुद्धा शिवा काळे यांच्या सामाजिक कार्याचा आलेख हा वाढताच आहे यात शंका नाही. सामाजिक कार्यातून समाजसेवेची वाट तुडवत निघालेला शिवा काळे सारखा एकटा वाटसरू पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारा आहे. तालुक्यात घोटी गावात सामाजिक कार्याच्या जोरावर कायम चर्चेत राहणारा आणि चमनकणारा समाजसेवक शिवा काळे सारखा तारा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एन्ट्री मारतो की काय असा धसका स्थानिकांसह तालुक्यातील भल्या भल्या पुढाऱ्यांना लागला आहे.(Nashik Politics)

शेवटी जनता जनार्धन असते आणि जनतेच्या सुखदुःखात समाजसेवा रुपी कार्य करणाऱ्या व्यक्तीची एक दिवस जनता दखल घेतेच यात शंका नाही.अनेक लोकप्रतिनिधीना बॅक फूट वर टाकत डिस्टिंगशन मध्ये विकासकामे करणारा युवा उर्जात्मक शिवा काळे तरुणांसाठी एक दिशादर्शक ठरत आहे.याच त्यांच्या कार्याची दखल भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत जनतेने घेणं अपेक्षित आहे.जनतेसाठी कोणत्याही क्षणाला केव्हाही कार्यतत्पर असणारे शिवा काळे यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनतेने अश्या प्रामाणिक निर्भीड कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी म्हणून संधी द्यायला हवी म्हणजेच समाजकारणातून तळागाळातील राजकीय कार्यकर्ता घडेल असे श्री काळे यांच्या मित्र परिवाराची अपेक्षा आहे.

आज मितीस जनतेने निवडून दिलेल्या भल्या भल्या पुढाऱ्यांपेक्षाही सामान्य कार्यकर्ता असलेले शिवा भाऊ काळे यांचे काम दमदार आहे. सामान्य कार्यकर्ता इतके काम करू शकतो तर निवडून दिलेले पुढारी करतात काय..? असा यक्ष प्रश्न शिवा काळे यांच्याकडे बघितल्यावर सामान्य जनतेला पडल्याशिवाय राहत नाही. सामान्य जनतेसाठी कायम कार्यतत्पर उपलब्ध असणारा व आपल्या सामाजिक कार्याचा आलेख दिवसागणिक वाढवणारा भुजबळांचा सामान्य कार्यकर्ता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांनाच जड भरणार हे मात्र नक्कीच.(Nashik Politics)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here