जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

0
41
दिव्यांग दिनानिमित्ताने सिद्धांत राठी या विद्यार्थाचा सन्मान करतांना अश्विनी धोंगडे समवेत प्राचार्य कैलास गवळी

प्रसाद बैरागी
निफाड प्रतिनिधी : तालुक्यातील उगाव येथील महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित,छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालय,उगाव येथे आज दि ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

दिव्यांग दिनानिमित्ताने सिद्धांत राठी या विद्यार्थाचा सन्मान करतांना अश्विनी धोंगडे समवेत प्राचार्य कैलास गवळी

यावेळी निफाड पंचायत समितीच्या विशेष शिक्षिका अश्विनी धोंडगे यांनी उपस्थितांना दिव्यांग दिनाच्या माहितीसह दिव्यांगांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे तसेच वेळप्रसंगी सहकार्य देखील केले पाहिजे असे मनोगतातून व्यक्त केले.

उगाव विद्यालयात एकूण १७ दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत असून प्रातिनिधिक स्वरूपात इयत्ता १२ वी मधील विद्यार्थी कु.सिद्धांत राठी या विद्यार्थाचा सन्मान विशेष शिक्षिका अश्विनी धोंडगे यांच्या हस्ते विद्यालयात करण्यात आला,तसेच विद्यालयाच्या वतीने धोंडगे यांचा सन्मान प्रा.सीमा सोनवणे यांच्या हस्ते केला,यावेळी प्राचार्य कैलास गवळी यांनी मनोगतात दिव्यांग दिनाची माहिती सांगितली, याप्रसंगी प्राचार्य कैलास गवळी, नंदराम ढिकले, राजाराम वाबळे, विजयकुमार कोतवाल,प्रा.संजय सानप, प्रा.संजय पाटील, सुनीता वाबळे,सचिन वाबळे, बापू आव्हाड,युवराज गायकवाड, रविकिरण जोंधळे, शाळीग्राम बोरसे, सरला बजाज, सरला आहेर,रुकसाना पठाण, सुजाता जाधव, संजय कोकतरे, गणेश मेधने, संदीप अहिरे,शीतल ढोमसे, करीम तांबोळी, ज्ञानेश्वर आहेर,अतुल पाटील आदी उपस्थित होते,याप्रसंगी प्रास्तविक राहुल दवते तर आभार प्राचार्य कैलास गवळी यांनी मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here