Deola | ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात देवळ्यात असहकार आंदोलन

0
60
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात (दि ७) जूनपासून तालुक्यात असहकार आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देवळा येथील राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने एका निवेदनाद्वारे दिली. यासंदर्भात युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि ३) रोजी गटविकास अधिकारी भरत वेंदे यांना देण्यात आले आहे.

निवेदनाचा आशय असा, सन 2023-24 या आर्थिक वर्षात ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्या सूचनेनुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मॉडेल स्कूल, मॉडेल व्हिलेज, मिशन भगीरथ, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हाताला काम, आयुष्मान भारत गोल्डन कार्ड, शासन आपल्या दारी, पंचायत विकास निर्देशांक, मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रा आदी उपक्रम काटेकोरपणे नियोजन करून यशस्वी केलेले आहेत.

Deola | देवळा येथे श्री बालाजी व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ

दरम्यान, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखेच्या वतीने ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे सातत्याने तोंडी व लेखी पाठपुरावा करूनही ग्रामसेवक संवर्गाच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या अनुषंगाने संदर्भीय पत्रानुसार दिनांक 6 जुनपर्यंत प्रलंबित समस्यांची सोडवणूक न झाल्यास शुक्रवार (दि 7) जुनपासुन ग्रामसेवक युनियन डी.एन.ई. 136 जिल्हा शाखेच्या वतीने असहकार आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर ग्रामसेवक युनियन सचिव संभाजी देवरे, अध्यक्ष जितेंद्र झाल्टे, जगन्नाथ शिंदे आदींच्या सह्या आहेत.

Deola | देवळा तालुक्याला प्रथमच एवढे मोठे पद; केदा आहेर यांचे जल्लोषात स्वागत


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here