Malegaon | मालेगाव येथील मसगा महाविद्यालयातील गायत्री जगताप हिने बारावी विज्ञान शाखेत ९२.१७ टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली. अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या संघर्षाची दखल घेत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यांनी तिचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
गायत्रीच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले असून, आई मालेगाव येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम बघते. तिची लहान बहीण दहावीला शिक्षण घेत आहे. अतिशय गरिबीतून एम.एस.जी कॉलेज येथे सायन्स मध्ये 92% टक्के मिळवत तिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. संगमेश्वर भागातील काकूबाईच्या बाग परिसरात गायत्री ही वास्तव्यास आहे.
Dada Bhuse | मंत्री भूसेंच्या प्रयत्नांना यश; राज्यातील यंत्रमागांना वीजदर सवलत
अकरावीत असतानाच वडील दीपक जगताप यांचे हृदयविकाराने निधन झाले. आधीच आर्थिक परिस्थिती नाजूक, त्यातच बापाचं छत्र हरपल्याने आईच्या तुटपुंज्या मानधनात घर खर्च व शिक्षणाच्या खर्चाची परवड ही स्वतः लेकीने बघितलेली होती. अशा परिस्थितीत मामा अॅड. दिगंबर खैरनार यांनी वेळोवेळी दिलेलं बळ यातून यशाला गवसणी घातली. लहानपणापासूनच अभ्यासू असलेल्या गायत्रीने कुठल्याही शिकवणी शिवाय दरवर्षी अव्वल येण्याची परंपरा कायम ठेवली असून प्राथमिक शिक्षण भुईकोट किल्ला मराठी शाळा तर माध्यमिक शिक्षण काकाणी कन्या विद्यालयात घेऊन दहावीत ९७.४० टक्के गुण मिळविले होते.
वडील नसताना देखील बापाच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी कधी पायी तर कधी सायकलने कॉलेज करून बारावीचा प्रवास यशस्वी केला. असून या यशामुळे मालेगावच्या शिक्षण क्षेत्रात गायात्रीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात गायत्रीच्या प्रेरणेतून अनेक मुली घडतील असा विश्वास मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
Dada Bhuse | मंत्री भुसेंनी शब्द पाळला; वन हक्क समितीची आज बैठक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम