भारतात सापडले ओमीक्रोन कोरोनाचे रुग्ण

0
28

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; भारतासाठी एक चिंताजनक बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमीक्रोन या कोरोनाचे दोन रुग्ण भारतात आढळून आले आहेत.

ओमीक्रोन या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आत्ता पर्यंत जगभरातील सुमारे 24 देशांमध्ये हा नवा कोरोनाचा ओमीक्रोन प्रकार पसरला आहे. आणि आता भारतात देखील त्याची एन्ट्री झाली आहे.

कर्नाटक मध्ये या ओमीक्रोन चे दोन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

ओमीक्रोनच्या भारतात झालेल्या एंट्रीने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

प्रथम दक्षिण आफ्रिकेत हा ओमीक्रोन आढळून आला होता. त्यामुळे जगभरात चिंतेचे ढग दाटले होते. त्यानंतर वेगवेगळ्या देशांत याचा प्रसार झाला.

आता भारतात देखील हा व्हायरस आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्या दोघा जणांमध्ये आधी कोरोनाची लक्षणे आढळली होती. मात्र त्यांच्यात असलेला कोरोना हा ओमीक्रोनच आहे, हे निश्चित झालेले नव्हते.

मात्र आता या ओमीक्रोन ने भारतात एन्ट्री केल्याने सर्वांना काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

आता सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ही बातमी वाचलीत का?

हो तुम्ही ऐकलंत ते खरं आहे. च्युइंगम खाल्ल्याने कोरोना (Cowid) होत नाही. असं एका रिसर्च (Research) मधून स्पष्ट झालं आहे.

पण तुम्ही दैनंदिन (Daily) खात आहात ते च्युइंगम नाही हं! तर एक संशोधन (Experiment) करण्यात आलेलं अर्थात, एक एक्सपेरिमेंटल च्युइंगम आहे. ज्यामुळे कोरोनाला (Cowid) अटकाव केला जाऊ शकतो. असा दावा केला जात आहे.

आपण तसे तर सारेच च्युइंगम खात असतो. आपल्याला लहान पणापासून च्युइंगम न खाण्यासाठी बजावले जाते. च्युइंगम खाल्ले तर आईचा – बाबांचा (Mother – Father) किंवा कोणाही मोठ्यांचा धपाटा ही कधीतरी खावा लागला असेलच.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

काय सांगता! च्युइंगम खाल्ल्याने कोरोना होत नाही?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here