वॉर्डक्र.6 मध्ये तिकिटासाठी उमेदवारांचे ‘देव पाण्यात’ ; वर्चस्वासाठी वाढली चुरस

0
9

द पॉईंट नाऊ विशेष : सन 2021 च्या नगरपंचायत देवळा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 6 येथे होऊ घातलेल्या उमेदवारीसाठी उमेदवारांमध्ये तिकिटासाठी प्रचंड चढाओढ आहे. दत्तू शिवाजी आहेर, भारत कोठावदे, डॉ. अनिल चव्हाण, प्रमोद बंडू शेवाळकर, दिलीप सयाजी आहेर, प्रदीप विठ्ठल आहेर, प्रदीप तुकाराम आहेर, डॉ पंकज निकम, चिंतामण आहेर, यांच्या सुविद्य पत्नी इच्छुक आहेत.

भाजपा तर्फे अनेक जण या प्रभागात इच्छुक आहेत, त्यात प्रामुख्याने भारत कोठावदे, डॉ.अनिल चव्हाण, दिलीप सयाजी आहेर, प्रदीप विठ्ठल आहेर, प्रदीप तुकाराम आहेर, यांच्या सुविद्य पत्नी इच्छुक आहेत.

बंडू शेवाळकर यांच्या पत्नी अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. तर राष्ट्रवादी तर्फे दत्तू शिवाजी आहेर, डॉ.पंकज निकम, चिंतामण आहेर यांच्या पत्नी प्रबळ दावेदार मानले जाताय. तर पंकज निकम यांचा या वॉर्डात गेल्या वेळी निसटता पराभव झाला असल्याने यावेळी त्यांना सहानुभूती देखील असणार आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाने या प्रभागात अधिकृत उमेदवारी न देता मैत्री पूर्वक लढत देण्यावर भर दिला होता. त्यात अपक्ष उमेदवार प्रदीप तुकाराम आहेर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली परंतु अपक्ष असून सुद्धा प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे निमित्त करत केदा आहेर व योगेश आहेर यांच्या देवळा विकास आघाडी गटात जाऊन मिळाले. मात्र अपक्ष उमेदवाराला प्राधान्य देऊन सुद्धा पक्षांतराच्या निर्णयामुळे प्रभागातील मतदारांचा भ्रमनिरास झाला.

भारत कोठावदे यांच्या पत्नी सहकार क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क प्रभागात चांगला आहे. तसेच डॉक्टर दीपाली चव्हाण या वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांचा सुद्धा भाजपतर्फे विचार केला जाऊ शकतो. शीला दिलीप आहेर या मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडून आल्यात. देवळा शहराच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या परंतु प्रभाग क्रमांक 3 आरक्षित असल्यामुळे त्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये इच्छुक आहेत.

दत्तू शिवाजी आहेर यांच्या पत्नी मनिषा दत्तू आहेर या स्थानिक उमेदवार म्हणून या प्रभागात इच्छुक आहेत. त्यांचा विचार केला असता दत्तू शिवाजी आहेर यांचा जनसंपर्क प्रभागात दांडगा आहे. तसेच त्यांच्या मागे राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे. त्यांचे आजोबा कै.हरी महिपत आहेर हे देवळा ग्राम पालिकेचे माजी सरपंच होते.

दत्तू शिवाजी आहेर यांनी कोरोना महामारीत ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांच्या घरी अत्यावश्यक सेवा घरपोच पुरवल्यात यामुळे मतदारांकडून त्यांचा विचार केला जाऊ शकतो.

या प्रभागात सुशिक्षित मतदार असून त्यात प्रामुख्याने डॉक्टर, सरकारी अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व काही प्रमाणात व्यावसायिक आहेत. त्यामुळे देवळा नगरपंचायतीचे लक्ष या प्रभागावर अधिक आहे. पूर्व इतिहास बघता तिकीट कोणाच्या पारड्यात पडेल हे बघणे महत्वाचे आहे. परंतु या प्रभागाचा अभ्यास केला असता इथे स्थानिक उमेदवाराला मतदारांकडून प्राधान्य दिले जाऊ शकते असे प्रकर्षाने जाणवते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here