Deola | पिंपळगाव येथील मोदींच्या सभेसाठी जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार

0
64
Chandwad - Deola
Chandwad - Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार व नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव येथे (दि. १५) रोजी जाहीर सभा होणार असून, या सभेसाठी देवळा तालुक्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा नेते केदा आहेर यांनी दिली. देवळा तालुक्यातील बुथ प्रमुखांच्या बैठकीत केदा आहेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला तालुक्यातून हजारो कार्यकर्ते नेण्यासाठी व त्या पद्धतीचे नियोजन करण्यासाठी बुथ प्रमुखांना मार्गदर्शन केले.

Chandwad | शिवजयंती निमित्त केदा आहेर यांच्या हस्ते वैद्यकीय साहित्याचे वाटप

तसेच या सभेसाठी जिल्हाभरातून लाखो कार्यकर्ते उपस्थिती लावणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपा तालुका अध्यक्ष अतुल पवार, किशोर चव्हाण, जितेंद्र आहेर, महायुतीचे घटक पक्षाचे देवा वाघ, हर्षद मोरे, भिला आहेर, भाऊसाहेब आहेर, हर्षद भामरे, जगदीश शिंदे आदींसह महायुतीचे सर्व प्रमुख उपस्थित होते.

Deola | केदा आहेरांमुळे पहिल्यांदाच देवळ्याला शेतकरी संघाच्या नेतृत्वाची संधी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here