CBSE 10th 12th Results | गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला १० वी आणि १२ वीचा निकाल आज जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज आधी इयत्ता १२ वीचा आणि आता १० वीचा निकालही जाहीर केला आहे. CBSE इयत्ता १२ वी आणि १० वीचा निकाल cbseresults.nic.in आणि cbse.gov.in बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर झाला आहे. यासह DigiLocker वेबसाइट – digilocker.gov.in आणि UMANG ॲपवर देखील आता तुम्हाला हा निकाल बघता येणार आहे. इयत्ता १२ वी निकाल जाहीर झाल्यानंतर आजच १० वीचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. (CBSE 10th, 12th Results)
CBSE बोर्डद्वारे इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी या शैक्षणिक वर्षात १६,३३,७३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर, त्यापैकी १६,२१, २२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातून १४,२६,४२० विद्यार्थी हे परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, यावर्षी सीबीएसई बोर्डात २४ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तर, १ लाख १६ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेत.(CBSE 10th, 12th Results)
CA Result 2024 | CA परीक्षेचा निकाल जाहीर; असे आहेत देशातील टॉप 3 CA
CBSE 10th 12th Results | यावर्षीही मुलींचीच बाजी..
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सीबीएसई बोर्डच्या बारावीच्या निकालात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींची टक्केवारी वाढली आहे. यावर्षी ९१.५२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, दुसरीकडे मुलांचीही टक्केवारी वाढली आहे. यावर्षी ८५. १२ मुलं उत्तीर्ण झाली आहेत. मात्र, तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटले आहेत. गेल्या वर्षी ६० टक्के असलेले प्रमाण आता ५० टक्के झाले आहेत. तर, यावर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली असून, ६.४० टक्क्यांनी मुलींनी बाजी मारली आहे.(CBSE 10th, 12th Results)
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार..?
सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ देखील लवकरच १० वी आणि १२ वीचे निकाल जाहीर करण्याच्या तयारीत आहे. २० मे रोजी महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर होऊ शकतो. (CBSE 10th, 12th Results)
MSBSHSE HSC Result: प्रतीक्षा संपली राज्याचा निकाल 91.25 %, राज्यात कोकणच अव्वल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम