दहिवड येथे 16 जनावर दगावले ; अवकाळीने शेतकरी हैराण

0
10

देवळा प्रतिनिधी ; तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस व अभ्राछदित वातावरणामुळे दहिवड येथे ( दि १) रोजी तब्बल १६ लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडल्याने खळबळ उडाली आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की , देवळा तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे देवळा शेती पिकांबरोबरच मेंढपाळांचे देखील नुकसान झाले आहे.

देवळा तालुक्यातील दहिवड शिवारात अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्या

बुधवार पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे देवळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती मालाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरी पूर्णतः मेटाकुटीला आलेला आहे. या पावसामुळे काढणीस आलेल्या लाल कांदा खराब होण्याची शक्यता आहे. तसेच महागडी उन्हाळ कांद्याच्या रोपावर देखील दव पडून बुरशीनाशक रोगाचा प्रादुर्भाव हिउन खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे देवळा तालुक्यातील दहिवड येथील शिदेंवाडी भंवरी मळा येथील मेंढपाळ कौतिक शिंदे यांच्या ४ मेंढ्या,२ कोकरु,१बकरी,२बकरीचे पिल्ले,१गायीचे वासरू ,भवरी मळा येथील दादाजी देवरे यांच्या 6 मेंढ्या रात्रभर चाललेल्या पावसात गाठल्याने ही जनावरे मुत्यु मुखी पडल्याची घटना घडली आहे .

या प्रकरणी प्रशासनाने त्वरीत पंचनामा करावा व नुकसानग्रस्त मेंढपाळाला भरपाई मिळावी अशी मागणी प्रहारचे तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here