Dindori | भारती पवारांसमोर पक्षातूनच आव्हान; हरिश्चंद्र चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज

0
41
Dindori
Dindori

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : Dindori |  दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. प.सा.नाट्यगृह येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्त्यांच्या आग्रह व जनरेट्यामुळे उमेदवारी केल्याचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले.

प.सा.नाट्यगृह येथील बैठकीस अखिल भारतीय आदिवासी बचाव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.अशोक बागुल, आर.पी.आय जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती पोपटराव अहिरे, भाजपचे देवळा येथील पदाधिकारी पवन आहिरराव, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत वाघ, भाजपा सुरगाणा दिंडोरीचे माजी तालुका अध्यक्ष संजू बाबा कावळे, लक्ष्मण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्या कलावती चव्हाण, वैभव कावळे, हनुमंत सानप, आनंद गावीत, माजी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष समीर चव्हाण, बापू पाटील, विनायक खालकर, संजय कानडे, विजय आहेर यांच्यासह सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ, देवळा, चांदवड, येवला, नांदगाव, मनमाड, निफाड तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Dindori | हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार; शेतकऱ्यांना भावनिक साद

Dindori | भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना अनावर

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांनी विद्यमान राज्य मंत्री डॉ, भारती पवार यांच्या कामामुळे पक्ष रसातळाला गेल्याचे सांगितले. रक्त आटऊन दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपा पक्ष वाढवला. त्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्यावर केवळ जनरेटा व शेतकऱ्यांसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली. परंतु १९९५ ची अपक्ष निवडणुक जिंकण्याची पुनरावृत्ती लोकसभेत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण करतील, असा आशा वाद अनेकांनी बोलून दाखवला. सर्व आदिवासी संघटना माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पाठीशी उभ्या ठाकल्याचे पदाधिकारी यांनी सांगितले.

Dindori | हरिश्चंद्र चव्हाण ‘त्या’ निवडणुकीप्रमाणे विरोधकांचे डीपॉझिट जप्त करणार..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here