देविदास बैरागी
निफाड प्रतिनिधी ; निफाड तालुक्यातील बळीराजामागे लागलेली अवकाळी पाऊसाची इडा पिडा काही केल्या टळेना व बळीचे राज्य काही केल्या येईना. बुधवारी सकाळी अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनची दयनीय अवस्था झाली आहे. विशेषता तालुक्यात महत्वाचे पिक समजले जाणारे द्राक्ष मोठ्या संकटात सापडले आहे.
निफाड तालुक्यातील उगाव, निफाड, शिवडी, वनसगाव, नांदूर्डि, देवपूर, पिंपळगाव बसवंत सह तालुक्यात सोमवार, मंगळवार पासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पीक वाचविण्यासाठी औषध फवारणी करत शेतकरी पोटच्या पोरापेक्षा द्राक्ष पिकांची जिवापाड निगा राखत आहे. परंतु आज बुधवार सकाळ पासून जोरदार पाऊस सुरु झाल्याने शेतकरी मोठया संकटात सापडला आहे. रात्रंदिवस अधिक काळ पाऊसाचा जोर कायम राहिला तर या पावसाचा सर्वाधिक फटका फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष पिकांना आहे. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास लवकरच द्राक्ष घड सडण्यास सुरुवात होईल अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. महागडे औषधे घेऊन द्राक्ष पिकांवर फवारणी केली पण या अवकाळी पावसाने पिकाचे होत्याचे नव्हते करण्यास सुरुवात केली आहे.
आज सद्यस्थितीत द्राक्षबागा फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत सतत ढगाळ वातावरण व पाऊस होत असल्याने द्राक्षबागेत पानांवर व घडांवर डावणी यासारखे रोग वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच फुलोऱ्यातील द्राक्षमण्यांची गळ आणि द्राक्ष घडात पावसाचे पाणी साचत असल्याने घडकुज होत मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागात नुकसान होणार आहे.
दररोज एक वेळा किमान चार हजार रुपयांच्या रोग प्रतिकारक औषधांची फवारणी करायची अन पुन्हा पाऊसाने त्यावर पाणी फेरायचे हे नित्याचे झाले आहे. द्राक्ष पीक वाचविण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा द्राक्ष पिकांवर औषध फवारणी करावी लागत आहे. त्यात द्राक्षबागेत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याने बागात औषध फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर चालविणे मुश्किल होत आहे. अनेक वेळा दोन ट्रॅक्टरद्वारे फवारणि करावी लागत असुन उत्पादक आता हतबल झाले आहेत. महिनाभरापासुन सतत पाऊसाच्या आणि ढगाळ वातावरणामुळे सुर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्ष पिके धोक्यात आले आहे. सतत अवकाळी पावसामुळे द्राक्ष पंढरी व शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सलग पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट त्यानंतर दोन वर्षांपासून कोरोना साथ, पुन्हा गारपीट, पाऊस या संकटामुळे एक्स्पोर्ट दर्जाचे दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी अमाप पैसा खर्च करून यावर्षी तरी गारपीट, पाऊस होणार नाही अशी आशा बाळगत डोक्यावर बँकांचा व औषध विक्री करणाऱ्या दुकान मालकांचा शेतकरी डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढवून पीक घेण्यासाठी अहोरात्र झटत असतांना आज पुन्हा पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे..
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम