Horoscope 24 April 2024 | जोडीदारावर विश्वास ठेवणे गरजेचे; वाचा आजचे राशीभविष्य

0
29
Horoscope 9 May 2024
Horoscope 9 May 2024

Horoscope 24 April 2024 |  पंचांगानुसार आज 24 एप्रिल 2024 बुधवारचा दिवस हा खास आहे. आज ग्रहांमुळे वाशी योग, आनंदादि योग, सुनाफ योग, आणि सिद्धी योग यांचे काही राशींना सहकार्य मिळेल. आज शुभ कार्यासाठी सकाळी 07:00 ते 09:00 आणि सायंकाळी 5.15 ते 6.15 हे दोन शुभ मुहूर्त आहेत. तर, दुपारी 12.00 ते 01.30 पर्यंत राहुकाळ असेल. आज बुधवारचा दिवस हा सर्व राशींसाठी कसा असेल हे जाणून घेऊयात. वाचा आजचे राशीभविष्य –

मेष राशी –

आज सिद्धी योगामुळे नोकरदार वर्गाच्या लोकांना तुमच्या कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या ग्रहांची स्थिती ही उत्तम नियोजनाकडे नेणारी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या नियोजनावर लक्ष केंद्रित करा. नवीन सहकाऱ्यांना सहकार्य करा. संयमाने गोष्टी हाताळाव्यात. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या स्वभावाकडे आणि वर्तवणुकीकडेही लक्ष दिले पाहिजे. घरातील काही जबाबदाऱ्याही तुमच्यावर पडू शकतात. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, ज्या रुग्णांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी सावधगिरी बाळगावी. (Horoscope 24 April 2024)

वृषभ राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमांऐवजी स्मार्ट वर्क करायला हवे. तरच तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. सिद्धी योगामुळे व्यावसायिकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तरुणांना त्यांचे प्रेमसंबंध सांभाळण्यासाठी आज खूप मेहनत घ्यावी लागू शकते. विद्यार्थ्यांनी आळस टाळून जोमाने अभ्यासाला लागा. वैवाहिक आयुष्यात आज तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि सहकार्यामुळे तुमची अनेक कामे आज मार्गी लागतील.

मिथुन राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांनी आज आपली कामे पूर्ण करण्यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. सिद्धी योगामुळे व्यावसायिकांसाठी गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतरांची प्रगती पाहून मत्सर वाटू देऊ नये. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या संगतीकडे लक्ष द्यावे. त्यांच्याशी बोला आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयींबाबत बेफिकीर राहू नये. कारण शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुम्ही आजारांना बळी पडू शकतात.

Horoscope 22 April 2024 | ग्रहांमुळे आज ‘या’ राशींना फायदा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope 24 April 2024 | कर्क राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांनी आज काम करताना सावध राहावे. तुमच्या कामात काही चुका आढळू शकतात. यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. मात्र, रागावर नियंत्रण ठेवावे. अनुभवी किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सल्ल्याशिवाय व्यवसायाबाबत कुठलाही निर्णय घेऊ नका. व्यावसायिकांनी आज सरकारी नियम पाळावेत. अधिकाऱ्यांची धाड पडू शकते.

ग्रहांच्या स्थितीमुळे तुमचा मानसिक गोंधळ  वाढेल. त्यामुळे अशा स्थितीत तुमचा राग आणि तणावही वाढू शकतो.  अनावश्यक पैसे खर्च करणे थांबवा. तुम्हाला भविष्यात काही महत्त्वाच्या कामांसाठी पैशांची गरज भासेल. आज काही कौटुंबिक वाद होऊ शकतात ते जास्त पेटू नये. याची काळजी घ्या. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, नसांवर ताण आल्यामुळे तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो.  (Horoscope 24 April 2024)

सिंह राशी –

सिद्धी योगामुळे नोकरदार वर्गाच्या लोकांना एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. जे लोक नोकरी बदलण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी काही दिवस थांबणे योग्य असेल. व्यावसायिकाला त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्या ओळखी वापराव्या लागतील. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च टाळा. अन्यथा पुढे आर्थिक अडचणी येऊ शकतात. तुम्ही मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, योग, करायला हवे.(Horoscope 24 April 2024)

कन्या राशी-

नोकरदार वर्गाच्या लोकांना आज कामाचा ताण असेल. ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या टीमची मदत घ्यावी लागेल. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात आज इच्छित यश मिळेल. त्यामुळे तुमचा व्यवसायाचे नाव होईल. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल. तर ते आज सकाळी 7.00 ते 9.00 आणि संध्याकाळी 5.15 ते 6.15 या वेळेत करा. तरुणांचे मन कोणतेही काम करण्यात स्थिर नसेल. त्यांनी मन शांत ठेवावे. आज कोणी नातेवाईक मदतीसाठी आले तर, त्यांना मदत करा निराश होऊ देऊ नका. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, तुम्हाला बद्धकोष्ठता आणि तोंडाच्या अल्सरचा त्रास होऊ शकतो.

तूळ राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसोबत वाद टाळावे. आज तुम्हाला तुमचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. व्यावसायिकांनी अतिआत्मविश्वास बाळगू नये. आज विद्यार्थ्यांची सर्व इच्छित कामे पूर्ण होतील. ज्यामुळे तुम्ही करियरच्या बाबतीत सकारात्मक असाल. आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून चांगला असेल. त्यामुळे गुंतवणूक करण्यास हरकत नाही. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बाहेर जेवायला जाण्याचे नियोजन करू शकता. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, तुमचा आहार आणि दिनचर्या व्यवस्थित ठेवा. मधुमेहचा त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.(Horoscope 24 April 2024)

Horoscope 19 April 2024 | आज कोणतेही काम करताना काळजी घ्या; वाचा आजचे राशीभविष्य

वृश्चिक राशी – 

नोकरदार वर्गाच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी त्यांचा डेटा सुरक्षित ठेवा. तुमच्या कामात काही बदल होऊ शकतात.  यात तुम्हाला काही समस्या जाणवतील. व्यावसायिकांना व्यवसायातील आर्थिक तोट्यातून दिलासा मिळेल. तर, काही व्यावसायिकांना व्यवसायात तोटा सहन करावा लागेल. मात्र, संयम बाळगून पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा. तरुणांना विश्वास ठेऊन एखाद्या कामाची जबाबदारी दिली असल्यास त्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला शक्य तितके प्रयत्न करावे लागतील. कठोर परिश्रम करावे लागतील. कारण ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्ही आळशी होऊ शकतात. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, तुम्हाला सांधेदुखीची समस्या जाणवेल. (Horoscope 24 April 2024)

धनु राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा चांगला नसेल. काम करताना कामात अडथळे येत असल्यास तुमच्या कामाची पद्धत बदला. उत्पादनांची विक्री घटल्यामुळे व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागेल. तरुणांच्या मानसिक स्थितीमुळे त्यांना एकटेपणा जाणवेल. मूड सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. जे लोक घर बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. (Horoscope 24 April 2024)

मकर राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांनी आज काम वेळेवर पूर्ण करा. तुम्ही आता जितकी मेहनत घ्याल. तितक्या लवकर तुमची नोकरीत बढती होईल. तसेच तुम्ही सर्व सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय राखयला हवा. व्यावसायिकांनी आज नवीन करार करताना सावधगिरी बाळगावी. तुम्हाला आर्थिक समस्या येऊ शकतात. व्यवसायात अडचणी येणाऱ्या लोकांना आता दिलासा मिळू शकतो. तरुणांनी नातेसंबंधांबद्दल जास्त विचार केल्याने नात्यात आणखी नवीन गुंता निर्माण होऊ शकतो. आपल्या जोडीदारावर शंका घेण्याऐवजी त्यांच्यावर विश्वास ठेवा. तरच नाते टिकू शकेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुमचे आरोग्य सामान्य राहील. मात्र, निरोगी राहण्यासाठी व्यायाम आणि प्राणायाम करणे गरजेचे आहे.(Horoscope 24 April 2024)

कुंभ राशी –

सिद्धी योगामुळे आज नवीन नोकरीच्या शोधात असणारे लोक नवीन नोकरीसाठी अर्ज करू शकतात. ज्यामध्ये तुमची निवडही होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांनी तुमच्या वरिष्ठांची मतं सर्वोपरि ठेवून कामाला लागा. व्यावसायिकांनी व्यवसायासाठी कर्ज घेतलेले असल्यास ते वेळेवर फेडा. व्यावसायिकांना आज लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस चांगला आहे. वाईट लोकांच्या संगतीत राहू शकता. त्यामुळे सावध रहा. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुम्हाला खोकल्याचा त्रास होऊ शकतो.  (Horoscope 24 April 2024)

मीन राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांना आज तुमच्या वरिष्ठांकडून कामाच्या बाबतीत ऐकावे लागू शकते. त्यामुळे दुसऱ्यांच्या ऐवजी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. व्यावसायिकांनी ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन मालाचा साठा करावा. तसेच आपल्या कर्मचाऱ्यांसोबतही कठोर वृत्ती टाळावी. (Horoscope 24 April 2024)

कौटुंबिक समस्या होऊ शकतात. त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, वजन कमी करण्याकडे लक्ष द्या. अन्यथा वाढलेल्या वजनामुळे आजार होऊ शकतात. राग आणि अहंकार नियंत्रित ठेवावे लागतील. त्यामुळे आपले मन शांत ठेवून निर्णय घ्या. आज तुम्ही श्री गणेशाची प्रार्थना करावी आणि श्री गणेश चालिसा पाठ करावा. शक्य असल्यास एखाद्या जुन्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत करा.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here