
द पॉईंट नाऊ विशेष ; आजपासून देवळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्यात येणार असून, यासाठी ऑफलाइन अर्ज दाखल करून घेण्याची मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सी एच देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, बुधवार दि १ डिसेंबर पासून होऊ घातलेल्या देवळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. मात्र नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर सर्व्हर डाउन सारखा प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे उमेदवारांची या तांत्रिक अडचणी मुळे तारांबळ उडते . व मनस्ताप सहन करावा लागतो . निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन उमेदवारी अर्ज ऑफलाइन पद्धतीने दाखल करून घ्यावीत ,अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी( दि ३०) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सी एच देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे . यावेळी योगेश आहेर, जितेंद्र आहेर, सुनील आहेर, अशोक आहेर, अतुल पवार,दिलीप पाटील ,मनोज आहेर, संभाजी आहेर,दीपक आहेर,पुंडलिक आहेर, हर्षद भामरे,काकाजी आहेर,कैलास पवार ,दिलीप आहेर आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम