महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त तालुक्यातील माळवाडी येथे रक्तदान शिबिर

0
35
माळवाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिक्षकांना सन्मानित करतांना जयराम सोनवणे ,शिवाजी बागुल आदी पदाधिकारी

देवळा प्रतिनिधी ; महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त तालुक्यातील माळवाडी येथे अयोजित रक्तदान शिबिरात 123 रक्तदात्यांनी रक्तदान केले .

माळवाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिक्षकांना सन्मानित करतांना जयराम सोनवणे ,शिवाजी बागुल आदी पदाधिकारी

रविवारी माळवाडी येथे महात्मा फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे बाजार समितीचे माजी सभापती. योगेश आहेर , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर प्रा . आबासाहेब देवरे डॉ . निलेश जेजुरकर ,डॉ. अविनाश गोरे ,डॉ. प्रशांत खैरनार वृक्षमित्र बळवंत बागुल, शांताराम बागुल ,फुले माळवाडीच्या सरपंच उषाताई शेवाळे, माळवाडीचे सरपंच शिवाजी बागुल आदी उपस्थित होते. जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शिवाजी लहाडे यांनी दीपप्रज्वलन करून महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .

सदर कार्यक्रमास माळवाडी व फुलेमाळवाडी गावातील नागरिकांनी एकत्र जमून महात्मा फुले यांना अभिवादन केले . त्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात व्याख्याते डॉ . प्रदीप जायभावे यांनी महात्मा फुले यांच्या विषयी आजचे सामाजिक शिक्षण यांच्यावर अतिशय मार्मिक असे व्याख्यान दिले . तसेच दोन्ही गावातील असणारे शिक्षक यांना आमंत्रित करून खरा शिक्षक दिन साजरा करण्यात आला . तसेच शिक्षकांना महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा , पुष्पगुच्छ , प्रमाणात देऊन गौरविण्यात आले. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा व अंत्यविधीचा सोपस्कार पार पाडण्यासाठी मदत करणाऱ्यांना कोरोना योद्धाने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात सहभाग घेतला .

अशा सर्व covid-19 त्यांना सन्मानित करण्यात आले. तर रक्तदात्यांना ” सार्वजनिक सत्यधर्म ” हा ग्रंथ भेट देण्यात आला . सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे सचिव जयराम सोनवणे, अध्यक्ष साहेबराव बागुल ,उपाध्यक्ष लक्ष्मण बच्छाव, कार्याध्यक्ष नामदेव बागुल , प्रशांत शेवाळे , दीपक शेवाळे, यशवंत जाधव , संजय शेवाळे ,दिलीप आदमे , सुनील बच्छाव , किरण आहिरे , हेमंत बागुल, पंकज बागुल आदींनी विशेष परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here