Manoj Jarange | देवळा येथे मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत

0
46
Manoj Jarange
Manoj Jarange

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  मराठा समाजाच्या हितासाठी सुरू केलेला लढा आयुष्यभर सुरू ठेवणार असून मिळालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी येत्या १० फेब्रुवारी पासून पुन्हा आमरण उपोषणास बसत जीवाची बाजी लावणार आहे, असा विश्वास आज मनोज जरांगे पाटील यांनी देवळा येथे बोलताना व्यक्त केला. आज गुरुवारी (दि ८) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास देवळा मार्गे साल्हेर येथे जात असताना येथील शिवस्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाल्यावर ते बोलत होते. यावेळी देवळा शहर व तालुक्यातील मोठा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी जमला होता.

श्री.जरांगे पाटील सकल मराठा समुदायाला संबोधित करताना पुढे म्हणाले की, आपली एकजूट अशीच कायम राहिली तर शेतीचे प्रश्नही आपण सोडवू. ५७ लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळाले असून गणगोतातील सगेसोयऱ्यांना नोंद नसली तरी आरक्षण मिळणार आहे. असे असले तरी याची अंमलबजावणी होण्यासाठी सगळ्यांची साथ महत्वाची असणार आहे. यावेळी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करत कार्यक्रमच लावतो असे आव्हान दिले.

Ketaki Mategaonkar | केतकीच्या आवाजाने बहरणार उद्या नाशिकचा ‘पुष्पोत्सव’

यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक पंकज अहिरराव, उपनगराध्यक्ष मनोज आहेर,
देवळा नगरपंचायतीचे नगरसेवक संभाजी आहेर, जितेंद्र आहेर, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, संतोष शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष अतुल पवार, उमेश आहेर, डॉ. विश्राम निकम, प्राचार्य हितेंद्र आहेर, श्रीमती निलिमा आहेर, किशोर आहेर, हर्षद भामरे, राजेश आहेर, जगदीश पवार, कैलास पवार, दिनकर आहेर, सचिन सूर्यवंशी, अतुल आहेर, राजेश आहेर, भगवान आहेर आदीसह सर्व धर्मिय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here