द पॉईंट नाऊ विशेष ; होऊ घातलेल्या देवळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून , इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे . गत पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागातून केदा वाघ यांनी प्रतिस्पर्धी देवळा विकास आघाडीचे उमेदवार उमेदवार प्रशांत वाघ यांचा पराभव केला होता.
यावेळी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी या प्रभागाची आरक्षण सोडत सर्वसाधारण जागेसाठी निघाल्याने या प्रभागात चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे. या प्रभागात एकूण ६४१ मतदार संख्या असून यासाठी इच्छुकांनी प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. या प्रभागात शिवसेनेचे शहरप्रमुख मनोज आहेर हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार आहेत. मनोज आहेर यांनी गेल्या महिन्यात आपला वाढदिवसाचे औचित्य साधून नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. तर याच प्रभागात भाजपा कडून प्रकाश आहेर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. प्रगतिशील शेतकरी व आर्थिक दृष्ट्या सक्षम उमेदवार म्हणून प्रकाश आहेर यांची भाजप कडून उमेदवार निश्चित मानली जात असल्याने या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना पहावयास मिळू शकतो. भाऊ बंदकी ,नाते गोते व मित्र परिवार यावर या प्रभागतील उमेदवाराचे विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकिला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे एकंदरीत भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होईल . १ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने राजकीय घडामोडीनि वेग घेतला आहे . खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम