देवळा प्रतिनिधी ; राज्यघटना हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असून, घटनेचा अभ्यास त्यातील मूलभूत हक्क व कर्तव्ये प्रत्येक नागरिकांना ज्ञात असलेच पाहिजे असे प्रतिपादन डॉ. डी. एम. सुरवसे यांनी केले. येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या व्याख्यानात डॉ. सुरवसे यांनी भारतीय संविधानातील सार्वभौम, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय, स्वातंत्र्य, समानता, राष्ट्राची एकता आणि एकात्मता तसेच मूलभूत हक्के व कर्तव्ये याची विस्तृतपणे चर्चा केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन केले. प्रत्येक व्यक्तीने अधिकाराबरोबरच कर्तव्याचे पालन करावे असे आव्हान प्राचार्य आहेर यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर होते. प्रास्ताविक व संविधानाच्या उद्देशींचे वाचन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सतिश ठाकरे यांनी केले.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अण्णासाहेब पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा सन्वयक व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी के. आहेर, प्रा. अमित बोरसे, प्रा. विजय जोशी, डॉ. जयमाला चंद्रात्रे, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रा. यशवंत खैरनार यांनी मानले
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम